कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब म्हात्रे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 21 January 2021

मुंबई पुर्व उपनगरातील कॉग्रेसचे नामांकीत जेष्ठ नेते बाळासाहेब म्हात्रे यांचे आज राहत्या घरी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आले आहे.

घाटकोपर - मुंबई पुर्व उपनगरातील कॉग्रेसचे नामांकीत जेष्ठ नेते बाळासाहेब म्हात्रे यांचे आज राहत्या घरी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आले आहे. म्हात्रे हे विक्रोळीतील प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध होते. दरम्यान अनेक पक्षांच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांचा आपुलकीचा संबंध होता.

बाळासाहेब म्हात्रे यांनी मुला मुलींना शिक्षण सोयीस्कर व्हावे यासाठी विक्रोळी टागोर नगर येथे संदेश कॉलेजची निर्मिती केली त्यानंतर रात्रशाळेतून विद्यार्थी शिकून आपलं भविष्य उज्वल काराव यासाठी राजीव गांधी रात्र महाविद्यालय स्थापन करून होतकरू विद्यार्थ्यांना दिलासा दिला. त्यानंतर त्यांनी विक्रोळी पार्कसाईड येथे 1ली 8 वी पर्यंतची संदेश विद्यालय शाळेची स्थापना केली. अगदी कॉग्रेस सहीत अनेक पक्षांचे निकट असलेल्या बाळासाहेब म्हात्रे यांचे निधनांने कष्टकरी होत करू विद्यार्थ्यांचा आधार स्तंभ हरपल्याची भावना विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

मुंबई, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

म्हात्रे यांच्या अचानक जाण्याने म्हात्रे परिवारात तथा विद्यार्थी , शिक्षक यांच्यात पोकळी निर्माण झाली आहे. बाळासाहेब म्हात्रे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, चार नातवंडे असा मोठा परिवार आहे. यांच्यावर विक्रोळी टागोर नगर स्मशानभूमीत 21 जानेवारी सायं 7 वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे. बाळासाहेब म्हात्रे हे विक्रोळीत काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते. यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Senior Congress leader Balasaheb Mhatre passes away

----------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Congress leader Balasaheb Mhatre passes away mumbai news