वयाच्या ९५ व्या वर्षी जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं वृद्धापकाळाने निधन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

पत्रकारितेतील एक मोठं नाव, दलित, आदिवासींच्या प्रश्नांना कायम वाचा फोडणारे, पत्रकारितेतील लोकशाही मूल्य जपणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज निधन झालं.

मुंबई : पत्रकारितेतील एक मोठं नाव, दलित, आदिवासींच्या प्रश्नांना कायम वाचा फोडणारे, पत्रकारितेतील लोकशाही मूल्य जपणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज निधन झालं. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे हे ९५ वर्षांचे होते. यांचे त्यांच्या दादर येथील निवासस्थानी आज सकाळी 11 वाजता वृध्दपकाळाने निधन झाले. बरोबर एक महिन्याआधी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.  

दिनू रणदिवे यांचं पत्रकारितेतील योगदान मोलाचं आहे. 1956 साली त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरवात केली. दरम्यान समाजवादी पक्षाने सुरु केल्या गोवा मुक्ती संग्राम आणि पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. रणदिवे यांनी 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नियतकालिकेतून पत्रकारितेला सुरवात केली. 

1972 मध्ये रणदिवेंनी केलेले बांग्लादेश मुक्तिलढ्याचे वार्तांकनही गाजले होते. मुंबईवरील 26 /11च्या हल्ल्यावेळी त्यांनी धाडसाने छायाचित्रण करून पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते, जो या प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा ठरला. पुढे रणदिवे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रूजू झाले, महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. 15 सप्टेंबर 1985 रोजी ते मटातून निवृत्त झाले. त्यापूर्वी त्यांनी फ्रेंच वृत्तसंस्था एएफपीसाठीही काम केले होते. 2002 मधील गुजरात दंगलीचे वास्तवसुद्धा त्यांनी माध्यमांमध्ये आणले होते.

मोठी बातमी - वातावरण बदलल्याने सर्दी, ताप, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढली; यावर डॉक्टर म्हणतात...
 

महाराष्ट्राचे माजी मुजुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणदिवे यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिलीये. 16 मे रोजी त्यांच्या पत्नी सविताताई आपल्यातून निघून गेल्या आणि आज 16 जून रोजी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन झाले. संपूर्ण आयुष्य व्रतस्थ भावनेने पत्रकारिता करणारा, सामाजिक जाणिवा जागृत ठेवून समर्पित भावनेने काम करणाऱ्या एका पत्रकाराला आपण आज मुकलो, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या निधनाने एका संघर्षमय युगाचा शेवट झाला आहे. त्यांची पत्रकारिता ही आमच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. असं ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य भारतकुमार राऊत म्हणतात 

तर राजदीप सरदेसाई यांनी देखील रणदिवे यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिलीये, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन झाले आहे. ते संघर्षशील पत्रकार होते,  त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला होता अशी सरदेसाई यांची प्रतिक्रिया आहे. 

senior journalist dinu ranadive passed in mumbai due to old age

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior journalist dinu ranadive passed in mumbai due to old age