

D.B. Dhamanaskar Passes Away
ESakal
डोंबिवली : निसर्गातील विविध रंगरूपे, मानवी नातेसंबंध संवेदनशीलतेने टिपणारे ज्येष्ठ कवी दत्तात्रेय भास्कर धामणस्कर तथा द. भा. धामणस्कर (वय ९५) यांचे शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी डोंबिवली पूर्व येथील पाथर्डी स्मशानभूमीत विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.