करोनाचं कारण, मंत्री महोदयांना एअर अँब्युलन्सची परवानगी नाकारली, मुख्यमंत्र्यांचे आदेशही धूडकावले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

राज्याचे मंत्री व माजी मुख्यमंत्री यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नांदेड येथून मुंबईला विमानाने हलविण्यासाठी मागितलेली परवानगी प्रशासनाने दिली नसल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकार्यांनी दिली आहे.

मुंबई : राज्याचे मंत्री व माजी मुख्यमंत्री यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नांदेड येथून मुंबईला विमानाने हलविण्यासाठी मागितलेली परवानगी प्रशासनाने दिली नसल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकार्यांनी दिली आहे. ही परवानगी नाकारण्यात आल्याने ऍम्ब्युलन्सने नांदेड ते मुंबई हा ५७३ किलोमीटरचा प्रवास रस्त्याने करत निघाले असून आज रात्री ते मुंबईत पोहोचतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील संबंधित मंत्र्यांना एअर अँम्बुएलन्सने मुंबईला घेऊन येण्यासाठी सांगितलेले असतानाही करोना संसर्गाचे कारण दाखवत प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकार्यांनी परवानगी नाकारत मुख्यमंत्र्यांचे आदेशही धूडकावले आहेत. 

हो, क्या बात हैं ! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी शोधले चार 'लघुग्रह', युवा शास्त्रज्ञांची 'नासा'कडून दखल...

कोवीड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढे आणखी काही वैद्यकीय गुंतागुंत वाढायला नको म्हणून अधिक उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. उद्धव यांनीही  विमानाद्वारे तुम्हाला मुंबईला आणण्यासाठी योग्य ते निर्देश देतो, असे त्यांना आश्वसित केले.

करोनाच्या रुग्णाला विमानाद्वारे हलवता येणार नाही, असा नियम राज्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याने दाखवत याबाबत काहीही करण्यास असमर्थता दर्शविली. तसेच कोवीडसाठी एअर अँम्ब्युलन्स एकदा वापरल्यानंतर त्यासाठी मागणी वाढेल, आणि मग ती परवानगी नाकारता येणार नसल्याचेही कारण देण्यात आले. एअर  ऍम्ब्युलन्ससाठी परवानगी मिळण्यास विलंब होण्याची चिन्हे दिसू लागल्याने  संबंधित मंत्रीमहोदय  ऍम्ब्युलन्सने नांदेड ते मुंबई हा ५७३ किलोमीटरचा प्रवास रस्त्याने करत निघाले. आज राञी उशीरा ते मुंबईत पोहोचतील.

senior official from mantralaya refused to provide approval for air ambulance to covid affected minister


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior official from mantralaya refused to provide approval for air ambulance to covid affected minister