
Mumbai Airport Server Down : मुंबई विमानतळावरील सर्व्हर डाऊन! प्रवाशांचा खोळंबा
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवाशांची खोळंबा झाला असून तसेच प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या सर्व्हर क्रॅशमुळे विमान उड्डाणासाठी उशीर होण्याची शक्यता असून 50 मिनिटांपासून प्रवासी सामानाच्या प्रतीक्षेत आहेत.
हेही वाचा: अजबच! चक्क झाडाला लागले बटाटे, पाहण्यासाठी होतेय गर्दी; पाहा Video
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संगणक प्रणालीमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. याचा सर्व विमान कंपन्यांच्या चेक-इनवर परिणाम झाला. दरम्यान या समस्येचे निराकरण केले जात आहे आणि थोड्याच वेळात ऑपरेशन्स पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
हेही वाचा: मोदी-शाह सोडवणार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न? दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक