कृषीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत! विद्यार्थ्यांसाठी नवोपक्रम स्पर्धा; असा करा ऑनलाइन अर्ज

Mangal Prabhat Lodha: कौशल्यविकास विभाग विश्वविक्रमासाठी सज्ज ! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ला मिळतोय युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - मंत्री मंगल प्रभात लोढा
Maharashtra Skill Development Minister Mangal Prabhat Lodha announces initiatives to boost participation in the Seva First Innovation Challenge, which invites students, researchers, startups and innovators to submit solutions to real-world problems.

esakal

Updated on: 

विद्यार्थ्यांसह युवक-युवतींमधील नवकल्पना आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातून आतापर्यंत तीन हजारांहून अधिक विद्यार्थी आणि युवक-युवतींनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. इच्छुकांना १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

केंद्र सरकारच्या कौशल्य विभागामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून ही स्पर्धा राबविण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com