महाभयंकर वास्तव ! KEM रुग्णालयात 'इतके' कोविड मृतदेह आहेत पडून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाभयंकर वास्तव ! KEM रुग्णालयात 'इतके' कोविड मृतदेह आहेत पडून...

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक हा मुंबई शहरात आहे. त्यातच दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नवी उच्चांकी गाठतेय.

महाभयंकर वास्तव ! KEM रुग्णालयात 'इतके' कोविड मृतदेह आहेत पडून...

मुंबई - कोरोना व्हायरसचा सर्वाधिक हा मुंबई शहरात आहे. त्यातच दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नवी उच्चांकी गाठतेय. मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. अशातच मुंबईतल्या केईएम रुग्णालयातून एक भयानक वास्तव समोर आलं आहे. केईएम रुग्णालयात गेल्या तीन आठवड्यांपासून तीन रुग्ण असेच पडून असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून केईएममध्ये 7 कोविड-19 चे मृतदेह कोणीही ताब्यात न घेतल्यानं पडून असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कोणाचे नातेवाईक क्वांरटाईन आहेत तर कोणाचे कुटुंबीय गावी गेल्यानं मृतदेह रुग्णालयाच्या शवगारात पडून असल्याच त्यांनी सांगितलं. 

मोठी बातमी - पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढणार?   आयआयटी मुंबईचा नवा अंदाज...

या सात मृतांच्या नातेवाईकांनी अद्याप मृतदेह ताब्यात घेतले नाहीत. ज्यावेळी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात येते, त्यावेळी त्याचा पत्ता, फोन क्रमांक घेऊन त्यांची वैयक्तिक माहिती घेतली जाते. सध्या पालिका या मृतांच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून अद्याप कोणाशीही संपर्क होत नसल्याच महापौरांनी सांगितलं. त्यामुळे या सर्व मृत रुग्णांची माहिती पोलिसांना पाठवली असून डीसीपी या प्रकरणावर लक्ष देत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

पालिका कोणत्याच मृतदेहाची विल्हेवाट लावू शकत नाही. पालिकेला केवळ मृतदेह सेव्ह करण्याची मुभा असते. जोपर्यंत त्यांचे नातेवाईक मृतदेह घेऊन जात नाही तोपर्यंत पालिका किंवा रुग्णालय प्रशासन काही करु शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं. पुढे महापौरांनी सांगितलं की, यामुळे आपल्याला पोलिसांचीच मदत घ्यावी लागतेय. कारण कायद्याच्या चौकटीत राहून हे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सन्मानासहित सुपूर्द करायचे असतात.  

मोठी बातमी - 'ही' परवानगीही मिळाली, मुंबईतील मद्यप्रेमींसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी
 
केईएम रुग्णालय आणि मुंबईतल्या अन्य रुग्णालयात किती मृतदेह पडून आहेत यासंदर्भात गेल्या महिन्यात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत पडून असलेल्या मृतदेहांची माहिती मिळाली असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

मृतदेह रुग्णालयात असेल पडून असल्यानं आरोग्य यंत्रणेवर याचा खूप ताण वाढतोय. रुग्णालयातल्या डिनपासून सर्वांवर ताण येतो. त्यामुळे यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल असंही महापौरांनी स्पष्ट केलं आहे.

seven covid 19 bodies of positive patients are lying in kem hospital fro very long time

Web Title: Seven Covid 19 Bodies Positive Patients Are Lying Kem Hospital Fro Very Long Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top