कमीत कमी ७ ते ९ तास झोप मिळतेय ना ? नाहीतर आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम..

कमीत कमी ७ ते ९ तास झोप मिळतेय ना ? नाहीतर आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम..

मुंबई - आपलं आयुष्य अत्यंत धकाधकीचं त्याचबरोबर वेगवान झालंय. अशात आपल्या बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना देखील करावा लागतोय. यामध्ये मुख्यत्वे आपल्या हृदयाशी आणि आपल्या रक्तातील साखरेशी संबंधित म्हणजेच म्हणजेच ब्लडप्रेशर आणि डायबिटीज सारखे आजार बळावत चालले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक किंवा अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपली दरोरोजची झोप. आपल्या झोपेवर आपल्या हृदयाचं स्वास्थ्य अवलंबून आहे. 

परदेशात याबद्दल प्रदीर्घ संशोधन करण्यात आलंय. यामधून धक्कादायक आणि खाडकन डोळे उघडणारी एक बाब समोर आली आहे. प्रत्येकाला दररोज रात्री  ६ ते ८ तास झोप आवश्यक आहे असं यामध्ये नमूद करण्यात आलंय. यापेक्षा कमी झोप सातत्याने होत असेल तर साधारण ३ वर्षांमध्ये कोरोनी हार्ट डिसीज स्ट्रोकने मृत्यू होऊ शकतो किंवा मृत्य होण्याचं प्रमाण ११ टक्क्यांनी वाढतं, असं यात म्हटलंय. 

कमी किंवा अनियमित झोपेचे तोटे : 

आपली दररोज रात्रीची झोप कमी झाली तर आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या कडक होतात. आपल्या हृदयाकडे जाणारा आणि हृदयाकडून आपल्या अवयवांमध्ये होणारा रक्तपुरवठा बाधित होतो. यामुळे हृदयाशी संबंधित गंभीर आजार होतात. अनियमित झोपेमुळे किंवा कमी झोपेमुळे हार्ट-ऍटॅक, कार्डियॅक-अरेस्ट  किंवा हार्ट फेल्युअर सारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीची झोप आणि झोपेचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. मात्र निद्रा संशोधकांच्यामते प्रयेकाला ७ ते ९ तासांची झोप अत्यंत महत्त्वाची असते.  

नियमित आणि पुरेशा झोपेचे फायदे : 

दरम्यान तुमची झोप जर नियमित आणि पुरेशी असेल तर याचा मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचं ब्लडप्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. योग्य झोपेमुळे तुम्ही हार्ट स्ट्रोकपासून स्वतःला दूर ठेऊ शकतात. याचसोबत निद्रा संशोधकांच्या माहितीनुसार योग्य झोपेमुळे तुमचं मानसिक संतुलन बाधित राहतं, तुमची त्वचा तजेलदार राहते.  

निद्रा संशोधकांच्यामते अतिरिक्त झोप देखील अत्यंत धोकादायक आहे. जास्त झोपेमुळे देखील हृदयाशी निगडित आजारांचं प्रमाण वाढतं. जास्त झोपेमुळे हृदयाशी संबंधित आजारांचं प्रमाण ३३ टक्क्यांनी वाढतं. स्वीडनमध्ये याबाबत एक संशोधन करण्यात आलंय. यामध्ये ७९८ लोकांवर तब्ब्ल २० वर्ष अध्ययन करण्यात आलं.  यामध्ये ज्या व्यक्ती  ५ तासांपेक्षा कमी जोपणाऱ्या व्यक्तीमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा धोका दुपटीने वाढलेला पाहायला मिळाला.

एकंदरीतच बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे आपल्यातील अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही. मात्र अशात आपल्या कामाचं आणि जबाबदाऱ्यांचं योग्य नियोजन करणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी गरजेची झोप आपल्याला मिळू शकेल. 

seven to nine hour sleep is essential for physical and mental health 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com