लॉकडाऊनमध्ये पायीच निघालेले गावाकडे आणि कोरोनाने असाही घेतला जीव...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक

मुंबई : कोरोनामुळे जगभरातले काही देश पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले आहेत. भारतीतही २४ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान संचारबंदी असणार आहे. सर्व रेल्वेगाड्या, विमानं आणि वाहतुकीच्या सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही लोकं चक्क पायी चालत आपल्या घरी निघाले  आहेत. मात्र हे पायी घरी जाणं ७ जणांच्या जीवावर बेतलं आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर पायी निघालेल्या ७ जणांना एका टेम्पोने उडवलं. या भीषण अपघात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनांना बंदी असल्यामुळे हे मजूर पायीच प्रवास करत होते.

अभिमानास्पद ! बाळाला जन्म देण्याआधी 'या' मराठी महिलेने दिला कोरोना टेस्टिंग किटला जन्म

जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व प्रवासी देशात संचारबंदी सुरू असल्यामुळे आपल्या घरी जात होते. हे सर्व मजूर गुजरातला जात होते.  संचारबंदी असल्यामुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चालत हे मजूर गुजरात सीमेवर पोहोचले खरे, मात्र गुजरातकडची हद्द बंद असल्यामुळे त्यांना परत पाठवण्यात आलं. नाईलाजास्तव त्यांना परत मुंबईची वाट धरावी लागली.

वसईच्या दिशेनं परत येत असताना महामार्गावर एका भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोनं या सातही जणांना जोरदार धडक दिली. यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहे. विरार हद्दीतल्या भारोल परिसरात ही घटना घडली.

धक्कादायक : लॉकडाऊनमध्ये अरविंदने त्यांना सिगरेट नाकारली म्हणून त्याच्या पोटात घातला

या अपघातातील २ जणांची ओळख पटली असून ५ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पेटलेल्यांपैकी एकाचं नाव कल्पेश जोशी वय ३२ तर दुसऱ्याचं नाव मयांक भट वय ३४ असं आहे. त्यामुळे पायी घरी जाऊन स्वतःचा जीव वाचवण्याच्या नादात या मजुरांना जीव गमवावा लागला आहे.

seven people lost life while walking towards their hometome during lockdown 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven people lost life while walking towards their hometome during lockdown