मोखाडा - मोखाड्यात जलजीवन मिशन योजना कुचकामी ठरल्याने तसेच ऊन्हाच्या तीव्रतेमुळे भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासन टॅकर मुक्त मोखाडा तालुका करण्याच्या नादात, नागरिकांना पाण्यासाठी वेठीस धरत आहे..त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी सायदे वाघ्याचीवाडी येथील महिलांना महिनाभरापासुन रात्रभर विहीरीवर जागता पहारा द्यावा लागत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात 30 गावपाड्यांना 9 टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका पाणीटंचाई साठी संवेदनशील आहे. प्रतिवर्षी मोखाड्याला तालुक्याला भिषण पाणीटंचाई भेडसावते. यावर्षी जलजीवन मिशन योजनेमुळे पाणीटंचाई दुर होऊन, आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली येईल अशी अपेक्षा होती..मात्र, जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा ऊडाल्पाने, तालुक्यात वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात मोखाड्यात पाणीटंचाई टंचाई ला सुरुवात झाली आहे.ऊन्हाच्या काहीलीने विहीरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे तालुक्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलजीवन मिशन योजना कागदावरच राहीली आहे. त्यामुळे जलजीवन मिशन ची कामे झालेल्या गावपाड्यांत ही प्रशासनाला नाईलाजास्तव टॅकर द्वारे पाणी पुरवठा करावा लागला आहे..हंडाभर पाण्यासाठी विहीरीवर जागता पहारा...लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मोखाडा तालुका टॅकर मुक्त दाखवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होऊन ही तेथे टॅकर ने पाणी पुरवठा केला जात नाही. सायदे वाघ्याचीवाडी येथे महिनाभरापासुन पाणीटंचाई निर्माण झाली आहे.मात्र, त्याची दखल ग्रामपंचायत अथवा पंचायत समिती प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे येथील आदिवासी महिलांना, हंडाभर पाण्यासाठी विहीरीवर रात्रभर जागता पहारा द्यावा लागत आहे. रात्री बॅटरीच्या ऊजेडात विहीरीत जमा झालेले पाणी काढावे लागत आहे..टॅकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असलेले गावपाडे....हट्टीपाडा, ठाकुरपाडा, हनुमान टेकडी, गोळीचाचापाडा, धामोडी, मडक्याचीमेट, जांभुळवाडी, हट्टीपाडा, हेदवाडी, वाघवाडी, कुवर्याचवाडी, डोंगरवाडी, धामणी, हुंड्याचीवाडी, बादलपाडा, अंधेरवाडी, बिवलपाडा, सोनारवाडी, बोट्याचीवाडी, मोरध्याचापाडा, धाबणीपाडा, तेलीपाडा, वारलीपाडा, कुडवा, पिंपळगाव, बहिरोबाचीवाडी, वडपाडा, नावळेपाडा, सातुर्ली, या गावपाड्यांना 10 टॅकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे..पाण्याची खुप हालत आहे. दिवसा काम करायचे आणि रात्री हंडाभर पाण्यासाठी नंबर लावायचा. पाण्यासाठी आम्ही रात्री झोपतच नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची झोप मोड होत आहे.- सई सखाराम झुगरे, वाघ्याचीवाडी.दोन महिण्यापुर्वि येथील पाणीटंचाई ची गटविकास अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. तेव्हा तेथे पाणीटंचाई नव्हती. आता पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने, टॅकर द्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी पंचायत समितीकडे करणार आहे.- वैभव एरंडे, ग्रामसेवक, सायदे - जोगलवाडी..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.