बॉलीवूडची बदनामी केल्याच्या आरोपात शाहरुख-सलमान हायकोर्टात; अमलीपदार्थबाबतीतही बेजबाबदार वार्तांकन केल्याचा दावा

सुनिता महामुणकर
Monday, 12 October 2020

बॉलीवूड आणि अनेक प्रोडक्शन हाऊसचे नाव बेजबाबदार बातम्या देऊन बदनाम केले असा आरोप करणारा मानहानीचा दावा तब्बल चौतीस प्रोडक्शन कंपन्यांनी रिपब्लिक टीव्ही, टाईम्स नाऊ यांच्यासह पत्रकार अर्णब गोस्वामी आणि इतरांवर दिल्ली उच्च न्यायालयात आज केला.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात बॉलीवूड आणि अनेक प्रोडक्शन हाऊसचे नाव बेजबाबदार बातम्या देऊन बदनाम केले असा आरोप करणारा मानहानीचा दावा तब्बल चौतीस प्रोडक्शन कंपन्यांनी रिपब्लिक टीव्ही, टाईम्स नाऊ यांच्यासह पत्रकार अर्णब गोस्वामी आणि इतरांवर दिल्ली उच्च न्यायालयात आज केला. यामध्ये सुपरस्टार सलमान खान, आमीर खान आणि शाहरुख खानच्या कंपन्यांंचा समावेश आहे.

रिचा-पायलने तडजोडीने वाद सोडवा; उच्च न्यायालयाने बुधवारपर्यंत दिला अवधी 

सुपरस्टार सलमान खान, आमीर खान, शाहरुख खान, दिग्दर्शक करण जोहर, अजय देवगण, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर, इ.चा समावेश आहे. याबरोबर दि फिल्म एड टेलिव्हिजन प्रोड्युसर गिल्ड औफ इंडिया, द सिने एण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांनीही याचिका दाखल केली आहे. पत्रकार गोस्वामीसह प्रदीप भंडारी, नाविका कुमार, राहुल शिवशंकर यांच्या विरोधात याचिका केली आहे. बौलीवूड आणि प्रोडक्शन हाऊसबाबत अत्यंत वाईट शब्दात आधारहिन आरोप करण्यात आले आहेत, डर्ट, फिल्थ ड्रगिस्ट असे शब्द वापरुन बौलीवूडची बदनामी केली, असा आरोप याचिकेत केला आहे. 

मुंबईचं फुप्फुस वाचल्याचा आनंद! कांजूर कारशेडच्या निर्णयाचे पर्यावरणवाद्यांकडून स्वागत

अनील कपूर, अरबाज खान, आशुतोष गोवारीकर, नाडियादवाला, राकेश मेहरा, कबीर खान, रोहित शेट्टी, सोहेल खान, विशाल भारद्वाज आदींच्या प्रोडक्शन हाऊसचा यामध्ये
समावेश आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात घराणेशाही आणि काम मिळण्याच्या पद्धतीवर व्रुत्तवाहिन्यांंमधून आरोप करण्यात आले आहेत. तसेच अमलीपदार्थबाबतीतही सुसाट आरोप करून बेजबाबदार वार्तांकन केले आहेत असे याचिकेत म्हटले आहे.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shah Rukh Salman in High Court on charges of defaming Bollywood