शहापूर : ग्रामसेवकाला लाच घेताना अटक | Shahapur crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe crime

शहापूर : ग्रामसेवकाला लाच घेताना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शहापूर : कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या (bribe crime) शहापूर तालुक्यातील टेंभा ग्रामपंचायतीचे (tembha gram panchayat) ग्रामविकास अधिकारी राजेश देविदासराव बाळसराफ (Rajesh Balsaraf) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) ठाणे पथकाने (thane cell) रंगेहाथ पकडले. शहापूर पंचायत समितीच्या आवारात पाच हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: BMC ला कोरोनाकाळात जागा न देणाऱ्या पंचतारांकित हॉटेल्सना करसवलत का ?

याबाबत संबंधित महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याप्रमाणे शहापूर पंचायत समितीमध्ये सापळा लावण्यात आला होता. कामाचे बिल मंजूर करण्यासाठी टेंभा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेश देविदासराव बाळसराफ याने तक्रारदार महिलेकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.

मात्र तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात राजेश बाळसराफ याला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक पल्लवी पाटील यांनी दिली.

loading image
go to top