जयंत पाटील भाजपमध्ये जाणार? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, भाजपच्या वरिष्ठांबरोबर..

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत चर्चा सुरू आहे.
Sharad Pawar Group leader Jayant Patil
Sharad Pawar Group leader Jayant Patil esakal
Summary

'भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांबरोबर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यात काहीही तथ्य नाही.'

मुंबई : भाजपच्या (BJP) कोणत्याही नेत्याला मी भेटलो नाही. मलाही कोणी भेटलेले नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेत काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

तसेच लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत चर्चा सुरू असून, पुढील आठ दिवसांत जागावाटप निश्चित केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पाटील म्हणाले, ‘‘माझा भाजपच्या कोणाशीही संपर्क झालेला नाही. चर्चा झालेली नाही. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांबरोबर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यात काहीही तथ्य नाही. कारण गेले अनेक महिने मी दिल्लीला गेलेलो नाही. त्यामुळे कोणाची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही.’’

Sharad Pawar Group leader Jayant Patil
Maratha Reservation : मनोज जरांगेंना दिलेला 'तो' शब्द पाळावा; शाहू छत्रपती महाराजांचं सरकारला महत्त्वाचं आवाहन

‘‘राज्याच्या मंत्रिमंडळात मागील १७ ते १८ वर्षांपासून काम केले आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाण्यासाठी मंत्रिपद हे एकमेव प्रलोभन असू शकत नाही, अशी टिपणीही त्यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, आमच्या पक्षात फाटाफूट झाली आहे. तरीही आम्ही तरुणांना सोबत घेऊन चांगली कामगिरी करण्याचे नियोजन करत आहोत.’’

Sharad Pawar Group leader Jayant Patil
Sangli Municipal Corporation : सांगली महापालिकेला तब्बल नव्वद कोटींचा दंड; काय आहे प्रकरण?

चर्चा घडवून आणणारा शोधा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निष्ठावंत असलेला पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपत जाणार असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. त्याला भाजपच्या नेत्यांनीही दुजोरा दिला होता. या चर्चेचा रोख जयंत पाटील यांच्याकडे होता. त्यामुळे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत ही चर्चा जाणीवपूर्वक केली जात असल्याचे सांगून आता पत्रकारांनीच अशी चर्चा कोण घडवून आणत आहे, याचा शोध घेण्याची सूचना त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com