Breaking : अजित पवार म्हणतात, 'मी राष्ट्रवादीतच, शरद पवारच आमचे नेते'

टीम ई-सकाळ
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे इतर आमदार यांना विश्वासात न घेत अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊन, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेते पदावरून हकालपट्टी झालेल्या अजित पवार यांनी आज ट्विट करून खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडखोरी करणाऱ्या अजित पवार यांची बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असे ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या या ट्विटमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण, शरद पवार यांनी काल सकाळपासून अजित पवार यांच्या निर्णयामागे राष्ट्रवादीचा कोणताही संबंध नसल्याचं आणि हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं स्पष्ट केलंय. पण, अजित पवार यांच्या या ट्विटमुळं शरद पवार यांना आता भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. 

 

काय म्हणालेत अजित पवार?

  • काळजी करण्याचे कारण नाही
  • फक्त थोडा संयम बाळगण्याची गरज
  • मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच
  • शरद पवारसाहेब आमचे नेते 
  • राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आघाडी स्थिर सरकार देईल 
  • तुम्ही दिलेल्या पाठिंब्या बद्दल आभार

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
अजित पवार यांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे इतर आमदार यांना विश्वासात न घेत अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊन, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याच वेळी ते शरद पवारसाहेबच आमचे नेते आहेत, असे वक्त्वय करून अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संभ्रम निर्माण केलाय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar is our leader ajit pawar sensational twitter post ncp bjp government