esakal | Share Market: निर्देशांक घसरले; अदानीमध्ये आजही जोरदार विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market-Down

Share Market: निर्देशांक घसरले; अदानीमध्ये आजही जोरदार विक्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेन्सेक्स 52 हजार 501 अंशांवर तर निफ्टी 15 हजार 767 अंशांवर बंद

मुंबई: शेअर बाजारात मंगळवारी सर्वकालीन उच्चांकी स्तरावर गेलेले भारतीय निर्देशांक आज (बुधवारी) नफावसुलीरुपी विक्रीमुळे अर्धा टक्का पडले. दिवसअखेर सेन्सेक्स 52,501 अंशांवर तर निफ्टी 15,767 अंशांवर स्थिरावला. काल सेन्सेक्स 52 हजार 773 अंशांवर तर निफ्टी 15 हजार 869 अंशांवर बंद झाला. पण आज शेअर बाजारात घसरण दिसून आली. अदानी समूहाचे समभाग आजही जोरदार विक्रीमुळे तीन ते पाच टक्क्यांनी कोलमडले. (Share Market Update Sensex closes just above 52,500 Nifty falls by 100 points)

हेही वाचा: तर तुम्हालाही मिळू शकेल लोकल ट्रेनने प्रवास करण्याची सूट

आज सेन्सेक्स 271 अंशांनी तर निफ्टी 101 अंशांनी घसरला. नेस्ले, एनटीपीसी, ओएनजीसी, हिंदुस्थान युनिलीव्हर या समभागांचे दर पाऊण ते दीड टक्का वाढले. तर पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, रिलायन्स ( बंद भाव 2,211 रु.), लार्सन टुब्रो (1,490 रु.) या समभागांचे दर एक ते दोन टक्का घसरले. अदाणी समुहातील ग्रीन एनर्जी चा समभाग सुमारे तीन टक्क्यांच्या आसपास तर टोटल गॅस, ट्रान्समिशन, पॉवर व एंटरप्राईज हे समभाग सुमारे पाच टक्के आणि अदाणी पोर्टच्या समभागाचे दर सात टक्के पडले.

आजचे सोन्या-चांदीचे दर

24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) - 48,410 रु.

चांदी (1 किलो) - 71,300 रु.

loading image