esakal | नवा फोटो शेअर करत कंगना राणावतचा पुन्हा एकदा राज्य सरकारला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

नवा फोटो शेअर करत कंगना राणावतचा पुन्हा एकदा राज्य सरकारला टोला

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा राज्य सरकारला टोला लगावला आहे. कंगनानं ट्विटरवरुन नवरात्रीचे फोटो पोस्ट केलेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीनं राज्य सरकारला पप्पू सेना असं म्हटलं आहे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

नवा फोटो शेअर करत कंगना राणावतचा पुन्हा एकदा राज्य सरकारला टोला

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा राज्य सरकारला टोला लगावला आहे. कंगनानं ट्विटरवरुन नवरात्रीचे फोटो पोस्ट केलेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीनं राज्य सरकारला पप्पू सेना असं म्हटलं आहे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

कंगनानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, नवरात्रीमध्ये कोणी कोणी उपवास ठेवला आहे? आज नवरात्रीनिमित्त हे काही फोटो काढले आहे. कारण मी स्वतः उपवास ठेवला आहे. माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमतचं नाही. माझी इतकी पण आठवण काढू नका, मी लवकरच येणार आहे.

कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

कंगना राणावतवर विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या बहिणीविरोधातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.  

बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कंगना करत असल्याचे याचिकेत म्हटले होते. कास्टींग डायरेक्टर मुनावर अली उर्फ साहिल सय्यद यांनी ही याचिका दाखल केली होती. समाज माध्यमात तसेच टीव्हीवर सगळीकडे बॉलिवूडच्या विरोधात बोलत आहे. ती सतत बॉलिवूड विरोधात माहिती पसरवली जात आहे. कंगनाविरोधात विरोधात दोघांनी वांद्रे न्यायालयात याचिका दाखल केली होती.  ज्यामध्ये म्हटलं होतं की 'कंगना राणावत तिच्या ट्विट्सच्या माध्यमातून दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याला प्रोत्साहन देत आहे. यामुळे केवळ धार्मिक भावनांना ठेच पोहोचत नाहीये तर इंडस्ट्रीतील कित्येक लोक दुखावले गेले आहेत. त्यामुळे कंगनावर जातीयवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप लावला गेला होता.

या प्रकरणी वांद्रे पोलिस स्टेशनने कंगनाच्या विरुद्ध हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. कोर्टाने कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले
होते. याचिकाकर्त्यांनी न्यायालयात कंगनाचे ट्विट्स सादर केले.  त्यानुसार कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता 154 (अ) , 295 (अ) , 124 (अ), 34 गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Sharing a new photo Kangana Ranaut once again attacked state government

loading image