esakal | राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरण: आणखी दोन मॉडेल पोलिसांच्या रडारवर
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Kundra

राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरण: आणखी दोन मॉडेल पोलिसांच्या रडारवर

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्राला (Raj kundra) पॉर्न फिल्म्स (porn films) प्रकरणात मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) गुन्हे शाखेने काल रात्री अटक केली. राज कुंद्रा हा या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. याच प्रकरणात राज कुंद्रासह नेरूळमधून आणखी एकाला अटक केली आहे. रायन जॉर्न थाँर्प असं या आरोपीचे नाव आहे. (shilpa shetty husbund Raj kundra porn film case two models on the radar of police dmp82)

राज कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अ‍ॅप्सची निर्मिती केल्याचं उघडकीस आलंय. या कंपन्यावर राज कुंद्रा काही दिवस स्वतः डायरेक्टर राहायचा आणि नंतर राजीनामा देऊन आपलाच एका म्होरक्या त्या पदावर बसवायचा. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेकडो अश्लील व्हिडिओचा डेटा मुंबई पोलिसांच्या हाती लागलाय. ज्यावरून राज कुंद्रा विरोधात सबळ पुरावे हाती लागलेत. या प्रकरणात आणखी 2 मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. पुढील कारवाईसाठी आज दुपारी १.३० वाजता राज कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा: "त्यात काय मोठा पराक्रम?"; राणेंचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल

या सर्व रॅकेटचा व्यवहार करण्यासाठी एक H accounts या नावाने 5 जणांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवला होता. या ग्रुपमध्ये राज कुंद्रा, मेघा विहान अकाऊन्टट, प्रदीप बक्षी, रॉय डिजिटल मार्केटिंग अकाऊन्ट, आणि रॉय इवेन्ट कन्टेट हेड या पाच जणांचा समावेश होता. या चॅटमध्ये या व्हिडिओतून कमावलेल्या पैशांचीही आकडा समोर आला आहे.

loading image