

Highlights of SCI's 65-Year Journey and Future Strategic Vision
Sakal
मुंबई : स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक जहाजबांधणी तसेच सागरी क्षमता विकसित करण्याच्या देशाच्या प्रयत्नांमध्ये ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने (एससीआय) अग्रणी भूमिका बजावावी, असे आवाहन केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले. 'एससीआय'च्या स्थापनेला साडेसहा दशके (६५ वर्षे) पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.