शिवसेना कॉंग्रेसला घोडेबाजाराचं खौफ ? 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

मुंबई : सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून घोडेबाजार होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन शिवसेना आणि कॉंग्रेसने सावध पवित्रा घेतला. या दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना निगराणीखाली ठेवले आहे. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना आणि कॉंग्रेस नेते आपल्या आमदारांवर विशेष लक्ष ठेवून आहेत.

शिवसेनेने काल आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतले. त्यांची व्यवस्था वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये करण्यात आली होती. मात्र, रंगशारदातील अडचण लक्षात घेऊन शिवसेनेने आपल्या आमदारांची व्यवस्था मालाड येथील "द रिट्रीट' हॉटेलमध्ये केली आहे. "द रिट्रीट'मध्ये शिवसेना आमदारांचा मुक्काम येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. 

कॉंग्रेसनेही खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या आमदारांना कॉंग्रेसशासित राजस्थानातील जयपूरमध्ये पाठवले आहे. जयपूरमध्ये कॉंग्रेसचे 25 ते 30 आमदार दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मावळत्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपकडून कॉंग्रेस आमदारांना आमिष दाखवले जात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्ष सावध झाला आहे.

Webtitle : shisvena and congress are on safe mode before government formation in maharashtra 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shisvena and congress are on safe mode before government formation in maharashtra