शिवभोजन थाळीबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला मोठा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

  • शिवभोजन आता केवळ पाच रुपयात
  • भुजबळ यांची माहिती; तालुकास्तरावरही नियोजन

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर तसेच विद्यार्थी उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येणार असून पाच रुपयाला थाळी देणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. दरम्यान, राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येणार असल्याने गरजी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कष्टकरी, असंघटित तसेच स्थलांतरित कामगार, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. आता तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि  शिधावाटप नियंत्रकांनी जिल्ह्यातील तालुकास्तरावरक तातडीने शिवभोजन केंद्र सुरू करावीत असे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११  ते ३ या वेळेत आणि अवघ्या पाच रुपयात भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे.

 Shiv Bhojan thali for only five rupees


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Bhojan thali for only five rupees