Raju Patil : 18 वर्षानंतर शिवसैनिकांना राज ठाकरे यांना ऐकण्याची संधी; मनसे आमदार राजू पाटील

कित्येक शिवसैनिकांच्या मनातील इच्छा आज पूर्ण होणार
Raju Patil
Raju Patilesakal

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे शिवसैनिकांना दिवंगत बाळासाहेबांची आठवण करून देते. राज यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर शिवसैनिक राज यांच्या मार्गदर्शनापासून त्यांच्या पाठिंब्या पासून दूर होते. परंतु आज खऱ्या अर्थाने त्यांना राज यांच्या खंबीर पाठिंब्याची साथ, त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जवळजवळ 18 वर्षानंतर राज ठाकरे हे शिवसेना व धनुष्यबाण या पक्षासाठी राज यांनी तोफ धडाडणार आहे. त्याअनुषंगाने आज कित्येक शिवसैनिकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी येथे व्यक्त केले.

Raju Patil
Pune Rain News : पावसाचा दुसऱ्या दिवशीही तडाखा

मनसे आमदार राजू पाटील यांची आजच्या राज ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी सांगताना म्हणाले, 18 वर्षानंतर राज ठाकरे हे धनुष्यबाण आणि शिवसेना या पक्षासाठी त्या स्टेजवर तिथे उभे असतील. आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांची इच्छा होती की राज यांना प्रत्यक्ष त्या स्टेजवर बघायला कधी मिळेल. आमच्या नशिबात तर आहे दरवर्षी आम्ही सभा बघत असतो. आम्ही त्या बाबतीत स्वतःला भाग्यवान समजतो. परंतु अनेक शिवसैनिक असे आहेत, त्यांना राज साहेब यांचे भाषण त्यांच्या स्टेजवर ऐकण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण होताना त्यांना दिसणार आहे. आणि त्या अनुषंगाने तेही जोरात कामाला लागले आहेत.

Raju Patil
Pune Rain News : पावसाचा दुसऱ्या दिवशीही तडाखा

राज यांची पंतप्रधान मोदी यांनी स्तुती केलेली आहे. चांगल्या कामाची स्तुती करायला काही हरकत नाही. आणि त्यांनी स्तुती यासाठी केली की निस्वार्थीपणे पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. कोणतीही मागणी न करता, देशाच्या विकासासाठी दिला. येथे दहा वर्षाच्या कालावधी समोर कोणतेही नेतृत्व नसताना देशावर प्रयोग करणे पडवणार नाही. आणि त्या अनुषंगाने विकासासाठी मोदीजींना राज यांनी पाठिंबा दिला आहे. आणि तो प्रामाणिकपणे दिला आहे.

मयुरेश कोतकर हा समाज बांधव आहे. परंतु तो कलाकार आहे. दि.बा. पाटील साहेबांचं नाव देण्याच्या आंदोलनात त्याला नाहक केस करून अडचणीत आणलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरचे केसेस काढण्यासाठी किंवा इतर अजून काही केसेस असतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून त्याविषयी कल्पना देणार आहोत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com