लाईट बिलाबाबत 'महावितरण'चा मनमानी कारभार; शिवसेनेचा धडक मोर्चा, गोरगरिबांची लाईट कट केल्याचा आरोप

महावितरणचा (Mahavitaran) लाईट बिलांचा मनमानी कारभार सुरू आहे.
Shiv Sena Mahavitaran
Shiv Sena Mahavitaranesakal
Summary

येत्या पंधरा दिवसात यात सुधारणा झाली नाही, तर मोठे आंदोलन करण्यात येणार, असा इशाराही बोडारे यांनी महावितरणला दिला आहे.

उल्हासनगर : महावितरणचा (Mahavitaran) लाईट बिलांचा मनमानी कारभार सुरू असून धनाढ्यांना 'अभय' तर गरिबांची लाईट कट करण्यात येत असल्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर धडक देऊन जाब विचारण्यात आला.

लाईट बिल (Light Bill) अमाप पाठवण्यात येत असून नागरिकांना त्याची उत्तरे समाधानकारक मिळत नाहीत. महानगरपालिकेने आमदार कुमार आयलानी यांच्या संस्थेला टाऊन हॉल चालवण्यास दिला आहे. या हॉलवर 32 लाखांच्या वर थकबाकी आहे. अशीच थकबाकी अनेक बड्या धनाढ्यांवर असून त्यांना अभय तर, एखाद्या गरीब विधवा महिलेचे दीड दोन हजार रुपये लाईट बिल असेल तर लाईट कट करण्यास महावितरण मागेपुढे पाहत नाही.

Shiv Sena Mahavitaran
'गोकुळ'ला आलेल्या 'त्या' निनावी पत्राच्या आधारे गुन्हे दाखल करा; औषध घोटाळ्याबाबत शौमिका महाडिक स्पष्टच बोलल्या

हा दुजाभाव थांबवण्यात यावा, अशी मागणी धनंजय बोडारे यांनी केली. सातत्याने विजेचा लपंडाव हा पाचवीला पुजलेला प्रकार झाला असून नेमकी पाण्याची वेळ असतानाच लाईट बंद होत असल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. येत्या पंधरा दिवसात यात सुधारणा झाली नाही, तर मोठे आंदोलन करण्यात येणार, असा इशाराही बोडारे यांनी महावितरणचे उल्हासनगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Shiv Sena Mahavitaran
Supriya Sule : 'आधी नागपूर होते, आता पुणे बनले राज्यातील गुन्हेगारीचे केंद्र'; खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र साहू, शहरप्रमुख कैलास तेजी, माजी नगरसेवक राजेश वानखेडे, माजी नगरसेवक शेखर यादव, उपशहरप्रमुख दिलीप मिश्रा, भगवान मोहिते, शिवाजी जावळे, राजन वेलकर, कृष्णा पुजारी, पदाधिकारी विजय सावंत, प्रकाश माळी, दीपक साळवे, संतोष गवते, आदिनाथ पालवे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com