BKC च्या पंपिंग स्टेशनवरुन शिवसेना - भाजपमध्ये पुन्हा टक्कर! कलानगरला झुकते माप देत असल्याचा भाजपचा आरोप

समीर सुर्वे
Wednesday, 5 August 2020

वांद्रे-कुर्ला संकुल येथे बसवण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनवरुन शिवसेना, भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल येथे बसवण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनवरुन शिवसेना, भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या पंपिंग स्टेशनमधून कलानगरमधील पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे कलानगरकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असताना मुंबईकडे मात्र, दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप भाजपने केला आहे. मुंबईत हे अशा प्रकारचे पहिलेच मिनी पंपिंग स्टेशन आहे.

किशोर कुमार यांच्या'ओ मेरे दिल के चैन' गाण्याचा व्हिडिओ शेअर करत आयुषमानने दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेछा..

कलानगर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटूंबीयांचे निवासस्थान मातोश्री आहे. हा सखल भाग असल्याने दरवर्षी येथे पाणी साचते. त्यासाठी पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात आले आहे. मात्र, आता पालिकेने बीकेसी येथे मिनी पंपिंग स्टेशन तयार करुन कलानगरसह इंदिरानगरमधील पाण्याचा निचरा करण्याची सोय केली आहे. हे पाणी वाकोला नदीत सोडले जाते. मिनीटाला 49 हजार 800 लिटर पाण्याचा निचरा करण्याची क्षमता या पंपिंग स्टेशनची आहे.

भारतीय थिएटर विश्वात क्रांती घडविणारे इब्राहीम अल्काझी यांचे निधन

महापौर किशोरी पेडणेकर यांनी या पंपिंग स्टेशनची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना या पंपिंग स्टेशनमुळे पाण्याचा उपसा वेगाने होत असल्याचा दावा केला. यावरुन भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी शिससेनेवर निशाणा साधला आहे. संपुर्ण मुंबईत पाणी तुंबलेले असताना महापौरांना फक्त कलानगरची चिंता आहे, असा टोला लगावला.

नालेसफाईचा दावा फोल!
महापौरांनी आज मुंबईतील विविध ठिकाणी पाहाणी केली. त्यात त्यांनी हिंदमाता परीसरातही पाहाणी केली. त्यावरुनही भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे. पाण्यात फोटोसेशन करण्याऐवजी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती. 113 टक्के नाले सफाई झाल्याचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे, असा आरोप भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena-BJP clash again from BKC's pumping station! BJP alleges that Kalanagar is being tilted