पश्चिम बंगालनंतर शिवसेना उत्तर प्रदेशातही लढवणार निवडणुका

समीर सुर्वे
Friday, 22 January 2021

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकाही शिवसेना लढवणार आहे.

मुंबई: पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकाही शिवसेना लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र 1991 मध्ये उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला होता. त्यानंतर शिवसेनेला राज्य बाहेर कधीही यश आले नाही. उत्तर प्रदेशातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत.

पहिली निवडणूक हरण्यासाठी दुसरी निवडणूक हरविण्यासाठी आणि तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी हे निवडणुकीच्या राजकरणाचे सूत्र बहुजन समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत काशिराम यांनी मांडले आहे. उत्तर प्रदेशात अनेक वेळा निवडणूक लढवूनही शिवसेनेने अद्याप निवडणुकीच्या राजकरणातील पहिला टप्प्याही पार केलेला नाही.
 
बिहार पाटी कोरीच

2015 आणि त्यानंतर 2020 मध्ये शिवसेनेने बिहार मधील विधानसभा लढवली. मात्र,त्यातही त्यांना यश आले नाही. 2020 मध्येही शिवसेनेची पाटी कोरीच राहीली होती. त्यापूर्वी बिहारमध्ये 80 जागा लढवणाऱ्या शिवसेनेने 0.6 टक्के मतं मिळाली होती.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
गोव्यात डरकाळी

गोव्याच्या 2017 निवडणुकीत शिवसेनेने वाघाची डरकाळी फोडली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाराज सुभाष वेलिंगकर यांच्या पक्षाची युती करुन शिवसेना मैदानात उतरली होती. मात्र दोन टक्क्यांपेक्षाही कमी मतं शिवसेनेला मिळाली होती.
 
जय श्रीराम

90 च्या दशकात भारतात विशेषत: उत्तर आणि पश्‍चिम भारतात रामजन्मभुमीचा मुद्दा मोठा झाला होता. त्यावेळी 1991 मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभेत शिवसेनेचा 1 आमदार निवडून आला होता. त्यानंतर शिवसेनेने अनेक वेळा उत्तर प्रदेशात निवडणूक लढवली. त्यांना यश आले नाही. मात्र,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे काही उमेदवार निवडून येत आहेत.

हेही वाचा- म्हणून राज ठाकरेंनी लिहिलं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना पत्र 

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Shiv Sena contest Panchayat elections Uttar Pradesh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena contest Panchayat elections Uttar Pradesh