Aditya Thackeray: शिवसेना बदलली! खुद्द आदित्य ठाकरेच का करतायत दावा?

आदित्य ठाकरेंनी बदल्या शिवसेनेचं व्हिजनंही एका कार्यक्रमात मांडलं
Aditya Thackeray latest marathi news
Aditya Thackeray latest marathi newsAditya Thackeray latest marathi news
Updated on

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या एकूण राजकीय परिस्थितीमुळं शिवसेना आता बदलली आहे असा आरोप अनेकदा शिंदे गट आणि भाजपकडून केला जात आहे. पण शिवसेना खरंच बदलली आहे, असा दावा खुद्द आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पण शिवसेना बदललीए म्हणजे नक्की काय झालंय, हे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. (Shiv Sena has indeed changed What exactly did Aditya Thackeray say need to know)

Aditya Thackeray latest marathi news
Sharad Pawar : पवारांवर नक्की कसले उपचार सुरू आहेत? डॉक्टरांनीच सांगितलं...

आदित्य ठाकरेंना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, शिवसेना खरंच बदलली आहे का? त्यावर आदित्य म्हणाले, "हो नक्कीच. कारण बदल ही एक नरंतर प्रक्रिया आहे. कारण कुठलाही पक्ष हा १०० वर्षे जुना असला तरी त्याला त्या काळातील गोष्टी मांडून चालणार नाही तर आजच्या मुद्द्यांवरच बोलावं लागेल"

शिवसेनेचं व्हिजनं काय?

तुम्ही ज्या प्रकारे मुद्दे उपस्थित करत आहात, जे दुसरा कुठलाही शिवसैनिक उपस्थित करताना दिसत नाही. यामध्ये हवामान बदल, पर्यावरण संवर्धन यांसारखे मुद्दे असतील. तुम्हाला असं वाटतं का की, तुमचे आजोबा आणि तुमच्या वडिलांपासून जी शिवसेना होती ती आता बदलली आहे? तुमच्यामते शिवसेनेचं व्हिजन काय आहे? या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं.

Aditya Thackeray latest marathi news
तुम्ही पहाटेचा शपथविधी केला, ती बेईमानी नव्हती का? शंभूराज देसाईंचा अजितदादांवर घणाघात

आदित्य ठाकरे म्हणाले, राजकारण तसेच माझे आजोबा आणि वडिलांचं करिअर हे वेगवेगळं होतं कारण प्रत्येक दशकाच्या वेगवेगळ्या प्रायोरिटी होत्या, ज्या लोकांसाठी महत्वाच्या होत्या. यामध्ये भूमीपुत्रांचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा विकासाचा मुद्दा असेल. तुम्हाला आठवत असेल तर सन २००२ मध्ये माझ्या वडिलांनी 'मी मुंबईकर' हा विषय मांडला होता. हा मुद्दा सर्वकाही मुंबईभोवती फिरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com