
संभाजीराजेंच्या उमेदवारीत पवार जिंकणार, उध्दव ठाकरे हरणार ?
मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कडव्या शिवसैनिकालाच धाडण्याचा इरादा केलेल्या आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरच संभाजीराजेंना मते देण्याची भूमिका घेतलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अखेर नमल् असून, ठाकरेंच्या अटी धुडणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेना पुरस्कृत करण्याची तयारी शिवसेनेची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडोमोर्डीमुळे राज्यसभेत मोदी सरकारविरोधात शिवसैनिकाला बळ देण्याचे ठाकरेंची व्यूहरचना फसल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या छुप्या खेळीमुळेच ठाकरे या निवडणुकीनिमित्ताने 'बॅकफूट' वर आले मानले जीत आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेला पाठिंबा असल्याचे पवार यांनी शनिवारी जाहीर केल्याने शिवसेनेच्या गोटात उत्साह होता. मात्र, शिवबंधन बांधण्याच्या प्रस्तावावर संभाजीराजे 'राजी' झाले नाहीत. तरीही, त्यांना खासदार करण्याचा राष्ट्रवादीचा 'मूड' न बदल्यानेच शिवसेना अर्थात, ठाकरेंना पवारांपुढे आपली मनसुबे गुंडाळावी लागणार असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या 'शब्दा'चा उपयोग करून घेत, राजसभेच्या सहाव्या जागेवर उमेदवार देण्याचा ठाकरेंचा निर्धार होता. त्यावर ठाम राहिले आणि दिल्लीत आपला आवाज बुलंद राहावा म्हणून या जागेवर शिवसैनिक राहणार असल्याचे त्यांनी स्वःपक्षाच्या आमदारांपुढे जाहीर केले होते. त्यानंतर मात्र, अपक्ष लढण्याच्या तयारी असलेल्या संभाजीराजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळेल, या चर्चेने शिवसेनेत खळबळ उडाली. त्यावरून ठाकरे, संभाजीराजे यांच्यात बैठकही झाली. तरीही ठाकरे आपला पवित्रा बदल्याच्या तयारीत नव्हते. ही जागा पदरात पाडण्याच्या हेतुने ठाकरे यांनी अपक्ष आमदारांना बोलावून बैठक घेतली आणि या निवडणुकीत शिवसेनेला उमेदवारासोबत राहण्याचा 'शब्द' ही त्यांच्याकडून घेतला. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना, ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.
मात्र, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील पवारांचे 'वजन' पथ्यावर पडण्याचा विश्वास असलेले संभाजीराजेंनी ठाकरेंची 'ऑफर' स्वीकारली नाही. त्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेसोबत राहण्याची घोषणा पवार यांनी केली. त्यामुळे ठाकरे हे शिवसैनिकालाच संधी देणार असल्याचे मानले जात होते. परंतु, गेल्या चार दिवसांत बैठकांच्या सपाट्यानंतर अखेर ठाकरे हेच संभाजीराजेंना पुरस्कृत करण्यात राजी झाल्याचे दिसत आहे.
या निवडणुकीच्या डावपेचात पवारांच्या डाव यशस्वी होणार आणि स्व:पक्षांयासाठी मोर्चेबांधणी केलेल्या ठाकरेंच्या चाली फसल्यासारखेच आहे. ठाकरे सरकारमधील घटक पक्षातील कुरखोड्यांच्या सामान्यात एरवी बाजी मारणारे, ठाकरेंना या निवडणुकीत मात्र, हार मानावी लागणार आहे. यामागे राष्ट्रवादीचा दबाव असल्याचेही सांगण्यात येत आहे. या सगळ्यांत साठमारी मात्र, शिवसैनिक नाराज असल्याचेही लपून राहिलेले नाही.
Web Title: Shiv Sena Is Ready To Reward Shiv Sena Sambhaji Raje
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..