गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न; संजय राऊतांचा आरोप

गोव्यात सुदिन ढवळीकर यांचाही फोन टॅप केला जातोय हे मीच त्यांना सांगितले.
Sanjay Raut
Sanjay Raut Sakal

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यात विरोधी नेत्यांचे फोन टॅपिंग होत असल्याचे मोठा आरोप केला आहे. एमजीपी नेते सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, काँग्रेस नेते दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर यांचे फोनही टॅप केले जात आहेत. गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे फोन टॅपिंगचा पॅटर्न राबवला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut On Goa Phone Tapping)

राऊत म्हणाले की, सध्या देशात जिथे निवडणुका (Assembly Election) सुरू असून, लवकरच निकाल लागणार आहेत. मात्र, तिथे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले जात आहे. फोन टॅपिंगचा हा प्रकार महाराष्ट्रात (Phone Tapping In Maharashtra) घडलेल्या प्रकारासारखेच असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात सरकार बनवताना फोन टॅपिंग सुरू झाले होते, तेव्हा येथे असलेले भाजपचे प्रमुख आज गोव्याच्या निवडणुकीचे प्रभारी आहेत.

Sanjay Raut
सुमीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सरकारचा महत्त्वाचा सल्ला म्हणाले...

गोव्यात सुदिन ढवळीकर यांचाही फोन टॅप केला जातोय हे मीच त्यांना सांगितलं, असं राऊत म्हणाले. शुक्रवारीच गोव्यातील (Goa) काँग्रेसकडून फोन टॅप प्रकरणाची मोठी माहिती जनतेला मिळाली आहे. उत्तर प्रदेशातही फोन टॅपिंग सुरू असेल, मला राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीही काळजी वाटते, असेदेखील राऊत यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com