
ठाणे : हिंदुत्व आणि सनातन धर्माबाबत चुकीची वक्तव्य केली तर आम्ही निश्चितच त्याचा निषेध व्यक्त करू. भगवा आमचा मान, सन्मान, अभिमान आहे. त्याला कोणी ठेच पोहचवत असेल तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे युवसेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी दिला. हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यावेळी माध्यमांशी बोलतांना पुर्वेश सरनाईक यांनी हा इशारा दिला.