लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून शिवसेना कोंडीत? महाविकास आघाडीवर भाजपची टीका

तुषार सोनवणे
Saturday, 21 November 2020

महाराष्ट्रातही असा कायदा आणवा यासाठी भाजप आग्रही आहे. यावरून भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

मुंबई - भाजपशासीत राज्यांमधील उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्यात येणार आहे.. महाराष्ट्रातही असा कायदा आणवा यासाठी भाजप आग्रही आहे. यावरून भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

व्हिडिओ - पत्री पूलाच्या गर्डर टाकण्याच्या कामावेळी मंत्री अदित्य ठाकरे उपस्थित

सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी भाजपच्या लव्ह जिहादच्या भूमिकेवर सडकून टीका केली. भाजपने गाई वाचवण्याचा कायदा केला परंतु त्यांच्याच गोशाळेत गाई भूकेल्या पोटी मरत आहेत.देशात बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य इत्यादी अनेक समस्या आहेत. त्याकडे दूर्लक्ष करण्याचा भाजपचा डाव आहे. लव्ह जिहादचे कायदे आणण्यापेक्षा महिलांना नोकरी, सुरक्षितता आणि सन्मानाने जगता यावे यासाठी कायदे करणं गरजेचं असल्याचे अस्लम शेख म्हणाले.

कॉंग्रेस नेत्यांनी ही भूमिका घेतल्यानंतर शांत बसतील ते भाजपनेते कसले? आमदार राम कदमांंनी या मुद्यावरून शिवसेनेला खडे सवाल केले. हिंदू भगिनींवर लव्ह जिहादच्या नावाखाली सुरू असलेला अन्यायाचे शिवसेना समर्थन करते का? बाळासाहेबांच्या लव्ह जिहादबद्दलच्या भूमिकेला आणि विचारांना विसरले का?   असे ते म्हटले. 

हेही वाचा - आदित्य ठाकरे- अतुल भातखळकर लढतीत, मनसे गेमचेंजर ठरण्याची शक्यता?

हरियाणातील निकिता तोमर हत्याकांडानंतर लव्ह जिहाद हा मुद्दा भाजपने उचलून धरला आहे. मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेश सारख्या राज्यांमध्ये या कायद्याचे विधेयक आणले जाणार आहे.  या प्रस्तावित विधेयकानुसार फसवणूकीने लग्न केल्यास 5 वर्षाची शिक्षा होणार आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असणार आहे.गुन्हात मदत करणाऱ्या व्यक्तीलाही तुरूंगाची हवा खावी लागणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena in trouble over love jihad issue BJPs criticism on Mahavikas Aghadi