Varun Sardesai : गद्दारीचा शाप लागलेला आहे... ; ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई यांचा शिवसेना (शिंदे गट) खासदार - आमदारांना टोला

महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. यावरून शिवसेना युवा नेते वरुण सरदेसाई यांनी शिंदे गटाच्या खासदारांना गद्दारीचा शाप लागला असून विधानसभा निवडणुकीत देखील ज्या 40 लोकांनी आम्हाला सोडलं त्यांना सुद्धा असेच भोगावे लागेल असे वक्तव्य करत खासदार, आमदारांना टोला हाणला आहे.
Varun Sardesai
Varun Sardesaisakal

डोंबिवली : महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. यावरून शिवसेना युवा नेते वरुण सरदेसाई यांनी शिंदे गटाच्या खासदारांना गद्दारीचा शाप लागला असून विधानसभा निवडणुकीत देखील ज्या 40 लोकांनी आम्हाला सोडलं त्यांना सुद्धा असेच भोगावे लागेल असे वक्तव्य करत खासदार, आमदारांना टोला हाणला आहे. सरदेसाई यांच्या या टोळ्यामुळे शिंदे गटात एक वेगळीच कुजबुज सुरू झाली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघात वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवार घोषित केल्यानंतर गुरुवारी डोंबिवली मध्ये युवा नेते वरुण सरदेसाई यांच्या डोंबिवली येथील निवासस्थानी टाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनिमित्त सरदेसाई डोंबिवलीत आले होते. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केले.

Varun Sardesai
Loksabha Election 2024 : रश्मी बर्वे यांची संधी हुकली; श्‍याम बर्वेच उमेदवार

युवानेते सरदेसाई म्हणाले,

जवळपास 13 लोकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. ते आता एकनाथ शिंदे सोबत गेले आहेत. आणि त्यातील जवळपास सात लोकांचे तिकीट हे कापले गेलेत असे आम्हाला माध्यमांच्या मार्फत समजत आहे. त्यात हेमंत पाटील असतील भावना गवळी असतील यांचे कालच तिकीट कापल गेलय. येत्या काळात अजून चार खासदारांचे तिकीट कापले जातील असं आम्हाला कळतंय. त्यामुळे गद्दारीचा जो काही शाप होता तो आता लागलेला आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा ज्या चाळीस लोकांनी आम्हाला सोडलं होतं त्यांना सुद्धा असंच भोगावे लागेल असे सरदेसाई म्हणाले.

सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा होऊनसुद्धा पत्ते कापले जातात, यामुळे कल्याण लोकसभेतील खासदार देखील सावध भूमिकेत असतील. की माझ्यासोबत असे होऊ नये. ते सुध्दा वारंवार सर्व्हे करत असतात. भाजप सुद्धा सर्व्हे करत असते. शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे निगेटिव्ह सर्व्हे आल्याने त्यांची तिकिटे कापली जातात. मला संशय आहे कल्याण लोकसभेतून देखील असाच निगेटिव्ह सर्व्हे गेला असेल म्हणून येथील उमेदवार घोषित केला नसेल असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे कल्याण लोकसभेतील शिंदे गटाच्या खासदारांना सणसणीत टोला हाणला.

ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्याविषयी बोलताना सरदेसाई म्हणाले, वैशाली दरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज डोंबिवली येथे बोलवली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे ताईंच्या मागे जसा पक्ष आहे तसाच लोकसभेतील सर्व मतदार देखील उभे राहतील. हा मतदार संघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा परत एकदा मतदार ठामपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मागे उभे राहतील आणि वैशाली दरेकर या कल्याण लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून येतील.

डोंबिवली हे माझं जन्मस्थान असल्याने माझी जबाबदारी आहे म्हणूनच आज मी इकडे आले आहे. मी केवळ एका ठिकाणी नाही तर पक्ष ज्या ज्या ठिकाणी जबाबदारी देईल तेथे नक्की जाईल. आणि आमची संपूर्ण टीम आज इकडे आहे. जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख केवळ प्रमुख पदाधिकारी म्हटले तरी एक मोठी फळी आज या उमेदवाराच्या पाठी उभी आहे. आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्या निवडून येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com