यंदा आव्वाsssज नाही! ना गर्दी, ना घोषणा शिवसेनेचा दसरा मेळावा मंत्री नेत्यांच्या उपस्थितीत

समीर सुर्वे
Saturday, 24 October 2020

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्क ऐवजी शेजारील स्वातंत्रविर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार आहे

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्क ऐवजी शेजारील स्वातंत्रविर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार आहे.या मेळाव्यात फक्त 50 जणांना उपस्थीत राहाण्याची परवानगी असून फक्त मंत्री,नेते आणि काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत हा मेळावा पार पडेल.

मुंबईतून हिरेदागिने निर्यातीत वाढ; अमेरिका युरोपात भारतीय हिरे उद्योगाची आगेकूच कायम

कोविडच्या निर्बंधामुळे यंदा सोहळे,मेळावे घेण्यास मर्यादा आहे.त्यामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर स्मारकात घेण्यात येणार आहे.सुरवातील 100 जणांच्या उपस्थीतीत मेळावा घेण्याचा प्रयत्न होता.मात्र,आता फक्त 50 जणांच्या उपस्थीतीत मेळावा घेण्यात येणार आहे.शिवसेनेच्या स्थापनेपासून काही अपवाद वगळता शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत पार पडला आहे.मात्र,यंदा मंत्री,नेते आणि काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत हा मेळावा पार पडणार आहे.
मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचा हा पहिलाच मेळावा आहे.तर,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेच्या स्थापनेला या दसऱ्याला दहा वर्ष पुर्ण होत आहेत.त्यामुळे ठाकरे पिता पुत्रांसाठी हा मेळावा महत्वाचा आहे.तर,1999 नंतर 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात असल्याने शिवसेनेच्या कार्याकर्त्यांसाठीही हा मेळावा महत्वाचा होता.मात्र,कोविडमुळे यंदा शिवसेनेला शक्तीप्रदर्शन करता येणार नाही.

राज्यातील ऑनलाईन परीक्षांवर सायबर हल्ल्याचा संशय; चौकशीसाठी समिती स्थापन

उध्दव ठाकरे सहकुटूंब शिवाजी पार्क येथील दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करतील.त्यानंतर 7 वाजण्याच्या सुमारास मेळावा सुरु होणार आहे.

या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण वृत्तवाहीन्यांवरुन होणार आहे.त्याच बरोबर शिवसेनेच्या सोशलमिडीयावरील अकांऊटवरुनही मेळाव्याचे थेट प्रक्षेपण होईल.या मेळाव्याच्या ठिकाणी पत्रकारांनाही उपस्थीत राहाण्याची परवानगी नाही

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Senas Dussehra rally is not crowded The meeting will be held in the presence of a few ministers