
उल्हासनगर : पोलिसांनी आणि विशेषतः क्राईम ब्रॅंचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या टीमने घुसखोरी करून राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरू केली आहे.अशातच बांगलादेशींचा ठावठिकाणा सांगा आणि 1,111 रुपये रोख बक्षीस मिळवा अशा युक्तीचे आवाहन करणारे कट-आऊट्स शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज यांनी उल्हासनगरात झळकावले आहेत.हे कट-आऊट्स शहरात चर्चेचे विषय ठरू लागले आहेत.