रेम्बो सर्कसच्या कलाकारांना शिवसेनेचा आधार; उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कपडे आणि धान्य वाटप

सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी टाळेबंदी सुरू झाल्यापासून सलग चार महिने सर्कस मधील 170 कलाकारांना राहण्यापासून कपडे आणि अन्न-धान्य देऊन मदत केली आहे.

नवी मुंबई : कोरोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीत उपासमार ओढवलेल्या रेम्बो सर्कसच्या कलाकारांसाठी शिवसेना आधारवड ठरली आहे. शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी टाळेबंदी सुरू झाल्यापासून सलग चार महिने सर्कस मधील 170 कलाकारांना राहण्यापासून कपडे आणि अन्न-धान्य देऊन मदत केली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्कसमधील कलाकार स्त्रीया, पुरुष आणि लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले. 

हॉस्पिटलने दिलं एक लाख तीस हजारांचे बिल, बिल पाहून रुग्णाने हॉस्पिटलमधून ठोकली धूम.

दरवर्षी हिवाळ्याच्या सुटीत रेम्बो सर्कस नवी मुंबईत येते. यावेळी सर्कस आली त्याच वेळेस शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. सरकारने सर्वत्र टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे सर्कस कोणी बघायला न गेल्यामुळे सर्कसचे उत्पन्न घटून उपसणार ओढवली. लहान मुले भुखेने व्याकुळ झाली. महिला आणि पुरुष कलाकार बेरोजगार झाले. ही माहिती मिळताच विजय चौगुले मदतीसाठी धावून आले. मार्च महिन्यापासून ते आत्तापर्यंत चौगुले यांच्याकडून कलाकारांना अविरतपणे मदतकार्य सुरू आहेत. सर्कस मधील 170 कलाकारांची काळजी चौगुले यांच्याकडून घेतली जात आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवशीच उद्धव ठाकरेंना ठाकरेंना टोला, म्हणालेत पंतप्रधान... 

चक्रीवादळाच्या वेळेसही सर्कसमधील कलाकारांना त्रास होऊ नये म्हणून चौगुले यांच्या सूचनेनुसार महिला कलाकारांना महापालिका शाळेत आणि पुरुष कलाकारांची एका रहिवाशी सोसायटीत तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. टाळेबंदीच्या काळात चौगुले यांनी कलाकारांना दिलेला मायेचा हात त्यांच्यासाठी आधार ठरल्याने सर्कसमधील कलाकारांनी चौगुले यांचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचार यांच्या हस्ते कलाकारांना कपडे आणि खाऊ वाटप करण्यात आला. या प्रसंगी विजय चौगुले, माजी नगरसेवक ममीत चौगुले आणि ऐरोलीतील शिवसैनिक उपस्थित होते.

---------------------------------

Edited by Tushar Sonawane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena's support to Rambo circus performers Distribution of clothes and food grains on the occasion of Uddhav Thackeray's birthday