कामाच्या वेळी न दिसणारे उद्घाटनाला दिसतात; शिवसेनेचा भाजपवर पलटवार

ठाणे ते दिवा मार्गिकेच्या कामावरुन दिव्यात शिवसेना भाजपामध्ये शुक्रवारी चांगलाच श्रेयवाद रंगल्याचे दिसून आले.
ShivSena BJP
ShivSena BJPsakal

डोंबिवली : ठाणे ते दिवा मार्गिकेच्या कामावरुन दिव्यात शिवसेना भाजपामध्ये शुक्रवारी चांगलाच श्रेयवाद रंगल्याचे दिसून आले. शिवसेना कामाचे संपूर्ण श्रेय लाटण्याआधीच भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना दिवा रेल्वे स्थानकात पाचारण करुन भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिव्यात शक्तीप्रदर्शन केले. याप्रसंगी भाजपचे आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या या खेळीवर शिवसेनेने पलटवार करीत कामाचा पाठपुरावा हा खासदार डॉ. शिंदे यांचाच असून प्रत्यक्ष कामाच्या वेळी उपस्थित नसणारे, रेल्वे समस्यांवर कधीही आवाज न उठविणारे आज उद्घाटनाला मात्र दिसले असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला. दिवा रेल्वे स्थानकातून सायंकाळी लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी सेना भाजपा कार्यकर्ते आमने सामने आल्याने पक्षाचा नारा देत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ShivSena BJP
Bird Flue: ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव

मध्य रेल्वे मार्गावरील पाचव्या सहाव्या मार्गिकेच्या कामाचे श्रेय लाटण्यावरुन शिवसेना भाजपमध्ये चांगलीच चढाओढ शुक्रवारी रंगली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गिकेचे उद्घाटन होणार असल्याने सकाळपासून भाजपा कार्यकर्त्यांनी ठाणे व दिव्यात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. मुख्य कार्यक्रमाआधीच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील लोकलने प्रवास करीत दिव्यात आले. त्यांच्यासोबत खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे. आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, गटनेते मनोहर डुंबरे यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी कोणीही एकट्याने हे श्रेय घेण्याचे काम नाही. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार, आमदार सर्वच प्रयत्न करीत होते. जर श्रेय कोणाला द्यायचेच असेल तर खरे श्रेय जाते ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असे वक्तव्य केले होते.

यावर सायंकाळी स्थानकातून एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखविण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे आठही नगरसेवक, भाजपमधून शिवसेनेते गेलेले पदाधिकारी यांनी रेल्वे स्थानकात जमले. यापाठोपाठ भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, रमाकांत मढवी, विजय भोईर, सचिन भोईर यांसह अनेक कार्यकर्ते जमले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झेंडे फडकावित पक्षाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. आवाज कोणाचा शिवसेनेचा अशी घोषणा शिवसेना कार्यकर्त्यांनी करताच बेगानी शादि मै अब्दुला दिवाणा असे म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे काही काळ रेल्वे स्थानकातील वातावरण तापले होते. परंतू पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात होती. स्थानकातून रेल्वे सुटल्यानंतर स्थानकात ढोल ताशांच्या आवाजावर भाजप कार्यकर्त्यांनी ठेका धरल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी तेथून काढता पाय घेतल्याचेही दिसून आले.

ShivSena BJP
पिंपरी : पाच कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

यावेळी ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी म्हणाले, देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे श्रेय पंतप्रधान यांना असते. मात्र 2014 ते 2021 या काळात खासदार शिंदे यांनी या कामासाठी पाठपुरावा केला आहे. आज उद्घाटनाला केंद्रीय मंत्री, बाजूच्या मतदार संघातील खासदार, ज्यांनी कधी रेल्वे समस्यांविषयी आवाज उठविला नाही असे आमदार येथे आले असतील, मात्र प्रत्यक्षात दिवेकरांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

काम सुरु असताना देखील मेगाब्लॉक दरम्यान खासदार कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून बसेसची सोय देखील करण्यात आली होती. प्रत्यक्ष कामाच्यावेळी खासदार शिंदे सोडून दुसरे कोणीही दिसले नाही ते आज दिसले. दिवेकर हे सगळं जाणतात असे म्हणत त्यांनी भाजपवर पलटवार केला. यामुळे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यात शिवसेना विरुद्ध भाजप हे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता आहे.

कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन

रेल्वे रुळ ओलांडू नका म्हणून रेल्वे प्रशासनाकडून वारंवार घोषणा केल्या जातात. दिव्यात मात्र सर्वसामान्य नागरिक रेल्वे रुळ ओलांडूनच अनेकदा प्रवास करताना दिसतात. शुक्रवारी शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसले. रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना, रेल्वे ब्रीजचा वापर करण्याऐवजी रेल्वे रुळ ओलांडने कार्यकर्त्यांनी पसंत केले. रुळ ओलांडतानाही ढोल ताशा वाजवित जल्लोष करीतच कार्यकर्ते जात होते. मास्क न वापरणे, गर्दी जमवित कोरोना नियमांचे देखील यावेळी उल्लंघन कार्यकर्त्यांनी केल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com