"ED आणि CBI ला चीन आणि पाकिस्तानची सुपारी देऊन सीमेवर पाठवा"; शिवसेनेची केंद्रावर जहरी टीका

सुमित बागुल
Monday, 30 November 2020

शेतकरी आंदोलनामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालंय. अशात आंदोलकांना पांगवण्यासाठी सरकारकडून अश्रुधुराच्या नळकांड्या, कडकडीत थंडीत थंड पाण्याचे फवारे ते थेट लाठीचार्जचा देखील वापर झाला.

मुंबई : शेतकरी आंदोलनामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालंय. अशात आंदोलकांना पांगवण्यासाठी सरकारकडून अश्रुधुराच्या नळकांड्या, कडकडीत थंडीत थंड पाण्याचे फवारे ते थेट लाठीचार्जचा देखील वापर झाला. दरम्यान, आजच्या सामनामधून केंद्राकडून वापरण्यात येणाऱ्या बळाच्या वापरावर सडकून टीका करण्यात आली आहे. आजच्या 'एखादा विषय हातातून निसटला की ‘हिंदुस्थान-पाकिस्तान’ हा खेळ सुरू करायचा ही त्यांची हातचलाखी ठरलेलीच आहे. शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी जिद्दीने लढतो आहे. तो पंजाबचा आहे म्हणून त्यास देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवले जात आहे. हा विचार दळभद्रीपणाचेच लक्षण आहे,' अशी ठाकरी भाषेतील घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे.

महत्त्वाची बातमी : जागा ठरली ! तुम्हाला दिली जाणारी कोरोनाची लस मुंबईत 'इथे' साठवली जाणार

एकीकडे शेतकऱ्यांना दिल्लीत शिरू दिलं जात नाही, मात्र दुसरीकडे चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसून ठाण मांडून बसले आहे. महाराष्ट्रातील अकरा सुपुत्रांनी देशासाठी आपले प्राण गमावलेत. महाराष्ट्रासह देशभरात राजकीय विरोधकांना चिरडण्यासाठी भाजप सरकार सर्व प्रकारचे हातखंडे वापरत आहे. मग ती जिद्द देशाच्या दुश्मनांशी लढताना का दिसत नाही?,' असा सवाल देखील शिवसेनेनं सामानातून उपस्तित केला आहे.  

महत्त्वाची बातमी :  बहिणी लिफ्टबाहेर निघाल्यात, मात्र पाच वर्षीय भाऊ निघताना सेफ्टी डोअर झालं बंद; लिफ्टमध्ये चिरडून चिमुरड्याचा मृत्यू

शिवसेनेकडून ED आणि CBI वर देखील पुन्हा एकदा निशाणा साधला गेलाय. विद्यमान सरकारचा असा समज आहे की, विरोधकांना नमावण्याचे तंत्र ED आणि CBI ला माहित आहे. त्यामुळे ED आणि CBI ला चीन आणि पाकिस्तानची सुपारी देऊन सीमेवर पाठवा. चीन आणि पाकिस्तान गुडघे टेकून शरण येतील, अशी ठाकरी शब्दातील खोचक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

shivsena on central government over use of ED and CBI targets BJP over farmers protest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena on central government over use of ED and CBI targets BJP over farmers protest