निलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून निवड, निवडणुकीविरोधात भाजपची न्यायलयात धाव

पूजा विचारे
Tuesday, 8 September 2020

विधान परिषदेच्या उपसभापती पदी डॉ. निलम गोर्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  ही निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी गोऱ्हे यांचं अभिनंदन केलं आहे.

मुंबईः विधान परिषदेच्या उपसभापती पदी डॉ. निलम गोर्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  ही निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी गोऱ्हे यांचं अभिनंदन केलं आहे. तर भाजपनं या निवडणुकीच्या विरोधात उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. ही निवडणूक होऊ नये ही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी सभापतींनी फेटाळली आहे. 

निलम गोऱ्हेंची बहुमतानं ही निवड झाली आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकून भाजपनं सभात्याग केला. महाविकास आघाडी सरकारची भूमिका हट्टाची असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. तसंच निवडणुकीच्या अधिकारापासून सरकारनं वंचित ठेवलं. महाविकास आघाडी सरकारला कामकाज रेटायचं असून उपसभापती  निवडीवर आमचा आक्षेप कायम असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.

सभापती रामराजे निंबाळकर यांनी निलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली आहे.  संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी  प्रस्ताव मांडला आणि त्याला शेकाप जयंत पाटील  यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभापतींनी निलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली. भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान उपसभापती अर्थात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. 

आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवड करू नये', अशी मागणी  प्रवीण दरेकर यांनी केली होती. मात्र  सभापतींनी, कोर्टात भाजप गेली आहे, कोर्टाने मला अद्याप काही कळवले नाही. त्यामुळे तुम्ही काय मागणी केली आहे, हे मान्य करणार नाही. विधिमंडळाला कोर्टाला आदेश देण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे सभापती म्हणून निर्णय मी घेईल अशा शब्दात सभापती निंबाळकर यांनी दरेकर यांना फटकारलं आहे.

निलम गोऱ्हे यांची थोडक्यात ओळख

  • शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या
  • शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या अशी त्यांची ओळख
  • सलग दुसऱ्या वर्षी त्यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड
  • शिवसेनेकडून अनेक वर्षापासून विधानपरिषदेचं प्रतिनिधित्व
  • आतापर्यंत तीनवेळा विधानपरिषदेवर निवड
  • महिला प्रश्नावर आक्रमकपणे मात्र अभ्यासू भूमिका मांडण्यात अग्रेसर
  • राज्य सरकारच्या विशेष हक्क समितीचे अध्यक्षपदही भूषवलं

भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाई गिरकर सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर आमदारपदी नियुक्त झालेत. गिरकर यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषवले असून याआधी राज्यमंत्रिपदाची धुराही सांभाळली आहे. 

Shivsena Leader Dr Neelam Gorhe elected Vidhan Parishad Deputy Speaker


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Leader Dr Neelam Gorhe elected Vidhan Parishad Deputy Speaker