यशवंत जाधव यांच्या दोन वर्षांत ३६ मालमत्ता!सोमय्या यांचा आरोप | Kirit somaiya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

यशवंत जाधव यांच्या दोन वर्षांत ३६ मालमत्ता!सोमय्या यांचा आरोप

मुंबई : शिवसेना उपनेते आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे (BMC Standing committee) तत्कालीन अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांनी २४ महिन्यांत ३६ मालमत्ता विकत घेतल्या असल्याचा आरोप आज भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला. जाधव यांची एवढी मालमत्ता (Property issue) असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती असेल, असा प्रश्‍नही सोमय्या यांनी केला.

हेही वाचा: मुंबई विभागीय मंडळाच्या अध्यक्षांनी घेतली SSC-HSC परीक्षा केंद्रांची झाडाझडती

जाधव यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. तेव्हा मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे प्राप्तिकर विभागाने पालिकेचे काही कंत्राटदार आणि जाधव यांच्या निकटवर्तीयांकडेही छापा टाकला होता. त्यात ३६ मालमत्ता जाधव कुटुंबियांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या संबंधित असल्याचा दावा प्राप्तिकर विभागाने केला होता.

जाधव यांनी त्या कोविडच्या मागील दोन वर्षांच्या काळात विकत घेतल्याचा आरोप आज करण्यात आला. या मालमत्तेची किंमत एक हजार कोटींच्या आसपास आहे. या प्रकरणात प्राप्तिकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय तसेच कंपनी मंत्रालयामार्फत चौकशी सुरू असून कारवाई होईल, असा विश्‍वास सोमय्या यांनी व्यक्त केला.

Web Title: Shivsena Leader Yashwant Jadhav Has Sixty Six Properties In Two Years As Kirit Somaiya Allegations Mumbai Political Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv SenaKirit SomaiyaBMC