आदित्य ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र, पत्रास कारण की

तेजस वाघमारे
Monday, 24 August 2020

देशातील राज्यांमधील सरकार अंतिम वर्षाच्या आणि विविध प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा मागणीसाठी संघर्ष करत आहे.

मुंबई :  कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने या कालावधीत अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि विविध प्रवेश परीक्षा आयोजित केल्यास विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या कुटुंबालादेखील कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच कोरोना आजारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरू करण्याची मागणीदेखील या पत्रात करण्यात आली आहे.

देशातील राज्यांमधील सरकार अंतिम वर्षाच्या आणि विविध प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा मागणीसाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे देशभरात आता परीक्षांचा मुद्दा चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे कारण देत ठाकरे यांनी या प्रकरणात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी मोदींकडे केली आहे.

मोठी बातमी : आरतीच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी भन्नाट आयडिया; सोसायटीच्या मजल्यांमध्ये लावले लाऊड स्पीकर

नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 मध्ये सुरू करा : 

आपल्या नेतृत्वाखाली देश कोरोनाविरूद्ध लढा देत आहे. यात नागरिकही प्रामाणिकपणे आपले योगदान देत आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने देशातील बहुतांश लोक घरूनच काम करत आहेत. अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठ, व्यावसायिक व अव्यासायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचे ठरवत आहेत. पण, जगभरात जिथे कुठे शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली, तिथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

हा विषय केवळ विद्यार्थ्यांशी संबंधित नाही, त्यांच्या कुटुंबीय आणि शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही आहे. त्यामुळे या विषयात हस्तक्षेप करून सर्व शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती ठाकरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर आपले शैक्षणिक वर्ष जून-जुलै 2020 ऐवजी जानेवारी 2021पासून सुरू करावे, ज्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे ठाकरे यांनी पत्रात म्हंटले आहे.

( संकलन - सुमित बागुल )

shivsena minister aaditya thackeray writes letter to PM modi to cancel this years exams


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena minister aaditya thackeray writes letter to PM modi to cancel this years exams