esakal | 'काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

'काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही'

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्यात.

'काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही'

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्यात. संजय राऊत यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच यूपीएचं नेतृत्त्व शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली. त्यानंतर काँग्रेस पक्ष भलताच आक्रमक झाल्याचं दिसतंय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नसीम खान यांनी राऊतांवर टीका केली आहे. काँग्रेसच्या अंतर्गत गोष्टींमध्ये न पडण्याचा सल्ला काँग्रेस नेत्यांनी राऊतांना दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी आजच्या अग्रलेखातून काँग्रेस नेतृत्त्वार खोचक टीकाही केली आहे.

काय लिहिलं आजच्या सामनाच्या अग्रलेखात

  • स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्यानंतर देश घडविण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता. काँग्रेस हा एक विचार होता व काँग्रेससाठी लोक लाठ्या खायलाही तयार होते. आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. राज्यातील प्रादेशिक पक्षांनीही स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल. या विषयात इतरांनी पडू नये, असे काँग्रेस नेतृत्वास वाटते. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आमचेही त्याबाबत वेगळे मत नाही. मोठ्या पक्षाच्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा!
  • यूपीएसमोर नेमका प्रश्न काय? UPA अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरु झाले आहे. UPA चे नेतृत्व कुणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. UPA भक्कम करावी व भाजपसमोर आव्हान उभे करावे, हा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष हे सर्व घडवून आणण्यास समर्थ असेल तर त्यांचं स्वागत आहे. आघाडीतील आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाकडेच आघाडीचे नेतृत्व असते, असे काँग्रेस नेते हरीश रावत म्हणतात. ते योग्य तेच बोलले आहेत, मात्र त्या पक्षाने जमिनीवर चालू नये. मोठी झेप घ्यावी. 
  • काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा? काँग्रेसच्या खालोखाल तृणमूल, अण्णा द्रमुक असे पक्ष संसदेत आहेत व हे सर्व भाजप विरोधक आहेत, देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंड्याखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा?
  • नितीशकुमारांचे सरकार असंतोषाच्या ज्वालामुखीत बिहारमधील नितीश कुमारांचे सरकार असंतोषाच्या ज्वालामुखीत रटरटत आहे. जदयुचे अरुणाचलातील 6 आमदार भाजपने फोडलेच, पण आता अशीही बातमी आहे की, बिहारमधील जदयुलाच सुरुंग लावून भाजप स्वबळावर मुख्यमंत्री बसविण्याच्या तयारीत आहे. बिहारात काँग्रेस, राजदसारख्या पक्षांचे आमदार ते फोडणार आहेत म्हणे. ते राहू द्या बाजूला, पण ज्या नितीश कुमारांना मांडीवर घेऊन ते राजशकट हाकीत आहेत, त्या नितीश कुमारांच्या पक्षालाच भोके पाडण्याचे काम सुरु आहे. यावर नितीश कुमार अस्वस्थ आहेत व त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितीश कुमारांनी जदयुचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले आहे. या सगळ्या घडामोडी देशातील विरोधी पक्षाने गांभीर्याने घ्यायला हव्यात. 

Shivsena mouthpiece saamana Sanjay raut on congress upa presidency

loading image