सामनातून सरकारला थेट 'हा' सवाल, जनतेचा धीर सुटणार नाही याचीही काळजी घेण्याचा सल्ला

सामनातून सरकारला थेट 'हा' सवाल, जनतेचा धीर सुटणार नाही याचीही काळजी घेण्याचा सल्ला

मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव पाहायला मिळतो. देशात कोरोनाचा प्रार्दुभाव थांबवण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू केला आणि त्यानंतर आर्थिक परिस्थिती ढासळली. लॉकडाऊन नंतर सरकारकडे काय योजना आहे? असा थेट सवाल शिवसेनेनं केंद्र सरकारला विचारला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून हा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 

काय म्हटलं आहे अग्रलेखात

लोकांना जगायचे आहे. आज लोकं इस्पितळात मरत आहेत. त्यांना मृतदेहांची भीती वाटत नाही, पण लॉक डाऊननंतर होणारी उपासमारी, आर्थिक दुरावस्था यामुळे घरांत, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी मुडदे पडू नयेत म्हणून राज्यकर्त्यांनीही 'कोरोना'चे भजन थांबवायला हवे. सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे. लोक आपोआप कामधंद्याला लागतील! 'लॉकडाऊन'नंतर सरकारकडे काय योजना आहे? याचे उत्तर कोरोनाच्या तिरडीवरून उठण्याआधीच जनतेला मिळावं अशी मागणी सामनाच्या अग्रलेखात केली आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या 'लॉक डाऊननंतर काय? कोरोनाच्या तिरडीवरून उठा!!' या शिर्षकाखाली हा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध पार पडत आहे. त्यामुळे राज्यावरील अस्थिरतेचे सावट दूर झाले आणि सर्व काही मनाप्रमाणे झाले. याचा आनंद राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना असला तरी जनतेचे संकट कसे दूर व्हायचे, हा प्रश्नच आहे. लॉक डाऊननंतर सरकारकडे काय योजना आहे? असा प्रश्न राहुल गांधींपासून अनेक प्रमुख नेत्यांनी विचारला आहे. या घडीला तोच प्रश्न महत्त्वाचा असून सरकारकडे त्यावर उत्तरही नाही आणि उताराही दिसत नाही. लॉक डाऊन काढायचा की वाढवायचा? याचा निकाल काहीही लागला तरी दोन्ही बाजूला मरण हे जनतेचेच आहे', असंही अग्रलेखात शिवसेनेनं म्हटलं आहे.

एक मात्र नक्की, कोरोनाच्या तिरडीवरून आता उठायला हवे. कामधंद्याला लागायला हवे. केंद्र सरकारने आता स्पष्ट केले आहे की, कोविड म्हणजे कोरोनापासून संरक्षण आवश्यक आहे, पण आता कामधंदे सुरू व्हायलाच हवेत. आर्थिक उलाढाल होणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर कोसळून पडलेली अर्थव्यवस्था साफ रसातळाला जाईल, अशी भीतीही शिवसेनेनं अग्रलेखात व्यक्त केली आहे.

अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

शाळा, कॉलेजेस, दुकाने, उद्योग, सार्वजनिक दळणवळण, विमान वाहतूक सध्या बंद आहे. लोकांची आवक थांबली आहे. मध्यमवर्गीय कालपर्यंत रेशन दुकानाच्या रांगेत उभा राहत नव्हता. त्यातील अनेकजण आता मोफत मिळणार्‍या धान्यवाटपाच्या मेहेरबानीवर जगत असल्याचे चित्र विदारक आहे. काम करणारे हात रिकामे आहेत आणि कोरोनाच्या तीन महिन्यांत सरकारला जो महसूल मिळाला तो कोरोनाच्या लढाईतच खर्च झाला. त्यामुळे सरकारची तिजोरीही तशी रिकामीच असल्याने लॉक डाऊननंतर करायचे काय? हा प्रश्न त्यांच्या समोरही आहेच. देशभरातील सर्व उद्योगधंदे कधी सुरू होतील ते अनिश्चित आहे.

कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे या सगळय़ा उद्योगांना खिळ बसली आहे. त्याचा परिणाम रोजगारावर होत आहे. याशिवाय असंघटीत क्षेत्रात काम करणारा वर्ग प्रचंड आहे. पंचतारांकित व मध्यम आकाराची हॉटेल्स, त्यावर अवलंबून असलेला ‘वाहतूक आणि पर्यटन’ व्यवसाय मोडून पडला आहे. रस्त्यावरचे खाद्य स्टॉल्स, किरकोळ विक्रेते, रिक्षावाले यांचे भविष्य अधांतरी आहे.

मोदींचे आणि महाराष्ट्राचे सरकार खंबीर आहे वगैरे ठीक, पण जनतेचा धीर सुटणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. अन्यथा लोकांच्या संतापाला तोंड देणे कठीण होईल. 

आता कशाला उद्याची बात, बग उडूनि चालली रात’, अशी अवस्था सगळ्यांचीच झाली आहे. लोकांना जगायचे आहे, अगदी इस्पितळाच्या वॉर्डात बाजूला मृतदेह ठेवून उपचार होत असतील तरी त्यांना जगायचे आहे. मुंबईतील शीव, केईएमसारख्या इस्पितळातील भयावह परिस्थितीचे चित्र समोर आले. 

इस्पितळांत खाटा शिल्लक नाहीत व अशा परिस्थितीत उपचार देणे व उपचार घेणे ही मजबुरी बनली आहे. लोकांना जगायचे आहे. आज लोकं इस्पितळात मरत आहेत. त्यांना मृतदेहांची भीती वाटत नाही, पण लॉक डाऊननंतर होणारी उपासमारी, आर्थिक दुरावस्था यामुळे घरांत, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी मुडदे पडू नयेत म्हणून राज्यकर्त्यांनीही ‘कोरोना’चे भजन थांबवायला हवे.

सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे. लोक आपोआप कामधंद्याला लागतील! ‘लॉक डाऊन’नंतर सरकारकडे काय योजना आहे? याचे उत्तर कोरोनाच्या तिरडीवरून उठण्याआधीच जनतेला मिळावे!

shivsena mouthpiece samana asks question to central government read full report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com