BMC निवडणूक पुढे ढकलणार? संजय राऊत म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut 1.jpg

BMC निवडणूक पुढे ढकलणार? संजय राऊत म्हणतात...

मुंबई: "देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना माझ्यावर टीका करु द्या. फडणवीसांना पुढची तीन-साडेतीन वर्ष टीकाच करायची आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, मंत्र्यांवर टीका करण्याचं विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे. काय टीका केली माहिती नाही. पण लोकशाहीत टीका स्वीकारली पाहिजे" असे संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितले. (Shivsena mp & leader sanjay raut on BMC election defer issue)

"सध्या कोरोना संकटकाळात महागाईसह महाराष्ट्रात काही प्रश्न आहेत. सरकार लोकांसाठी काही योजना आणतेय. विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारबरोबर काम केले पाहिजे. निवडणुकीच्या वेळी ऐकमेकांवर टीका करु, संघर्ष करु. त्यानंतर लोक जो कौल देतील तो स्वीकारु, पण आता वाद कशासाठी निर्मण करताय" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

महापालिका निवडणुकाच्या मुद्यावर राऊत म्हणाले.

कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, त्या मुद्यावर संजय राऊत यांना विचारले. त्यावेळी ते म्हणाले की, "विरोधी पक्ष हा उगाच घाई का करतोय? त्यांना कोणी सांगितलं, अशा प्रकारचे निर्णय होतात. त्यांना त्यांच्या हेरांनी बातमी दिली असेल, तर ती चुकीची बातमी आहे. त्या संदर्भात काही करायचं असेल, तर मुख्यमंत्री, निवडणूक अधिकारी स्पष्ट करतील. तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम का निर्माण करताय?" असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Raut