esakal | वाझेंच्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; विरोधकांवर साधला निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

वाझेंनी अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. वाझेंनी केलेले आरोप अनिल परब यांनी फेटाळून लावले आहेत.

वाझेंच्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; विरोधकांवर साधला निशाणा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - परमबीर सिंग यांच्यानंतर आता सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मुकेश अंबानी यांना धमकी दिल्या प्रकरणात सचिन वाझे यांना अठक करण्यात आली आहे. आता वाझेंनी अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. वाझेंनी केलेले आरोप अनिल परब यांनी फेटाळून लावले आहेत. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात आता पत्र लिहिण्याचा नवीनच ट्रेंड आलाय असं राऊत म्हणाले.

विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारला सातत्यानं घेरलं जात आहे. आतापर्यंत आघाडी सरकारच्या दोन मंत्र्यांना राजीनामाही द्यावा लागला आहे. यावरूनही संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले जात आहेत. अशा लोकांचा खरा चेहरा समोर येतो. आता नवीन ट्रेंड सुरु झालाय. जेलमध्ये असलेल्यांकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आंदोलन करायचं. अजुनही अनेक लोक जेलमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून खूप काही लिहून घेतलं जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचं घाण राजकारण देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही असंही राऊत म्हणाले. 

हे वाचा - "सचिन वाझेची चौकशी करा पण..."; न्यायालयाचे CBIला निर्देश

राजकीय षड्यंत्र
गुन्ह्यामध्ये अटक झालेल्या आरोपींकडून जेलमध्ये लिहून घेतात आणि पुरावा म्हणून समोर आणतात. हे राजकीय षडयंत्र आहे. यात अनिल परब यांचं नाव आलंय. अजित पवार आणि अनिल देशमुखांचेही नाव आले. मी अनिल परब यांना ओळखतो आणि ते अशी कामं कधीच करत नाहीत. कोणताच शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही. त्यांनी काल शपथ घेऊन आरोप फेटाळलेत आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे असंही राऊत यांनी सांगितलं. 

विरोधकांनी पत्र लिहिणाऱ्याबद्दल सांगावं
एनआय़एसाठी विरोधी पक्ष गालीचे अंथरत आहे आणि ही बाब दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकारला अशा पद्धतीनं अस्थिर करण्याचे कट रचले जात असतील तर ते यशस्वी होणार नाहीत असंही राऊत यांनी म्हटलं. तसंच काल एका पत्र लेखकाचं पत्र आलंय. एनआय़एकडे ते पत्र आहे आणि पत्रलेखक एनआयएच्या ताब्यात आहेत. एखाद्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी इतक्या यंत्रणा वापरल्या जात आहेत. पत्र खरं आहे का हे कोणीच सांगू शकत नाही. पत्र लिहिणारा माणूस किती प्रतिष्ठित, संत महात्मा आहे याबद्दल विरोधकांनी एकदा सांगावं असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

हे वाचा - "आरारा... काय वेळ आलीय, त्यांना कोणी तरी सांगा..."

काय लिहिलंय पत्रात
सचिन वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिलं असून यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचे गंभीर आरोप केले आहेत. वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना म्हटलं की, "गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून वसूली करण्यास सांगितलं होतं. त्यावर मी हे काम करणार नाही असं त्यांना कळवलं होतं. मात्र, त्यानंतर गृहमंत्र्यांच्या ज्ञानेश्वर या बंगल्यामधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या पीएने आपल्याला देशमुख यांची मागणी मान्य करण्याचा सल्ला दिला. मात्र, पुन्हा नकार देत मी याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दिली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी आपल्याला असं कृत्य न करण्याचा सल्ला दिला." 
 

loading image