उन्माद म्हणजे उदयनराजे; शिवसेनेचे चिमटे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 October 2019

2014 मध्ये भाजपचा वारु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोखला होता, आता 2019 मध्ये तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखला आहे. विरोधकांचे 20-25 आमदारही येणार नाहीत, असं माध्यमात चित्र उभ करणाऱ्यांनी 100 पारचा टप्पा गाठला.

मुंबई : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झालेले भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना चिमटे काढत शिवसेनेने उन्मादाचा शेवट उदयनराजे होतो, असे म्हटले आहे. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील खासदार संजय राऊत यांच्या रोखठोक या सदरातून शिवसेनेने आपली निकालाविषयी भूमिका स्पष्ट करताना उदयनराजेंनाही लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरु नका, महाराष्ट्राचा निकाल हेच सांगतोय, अशा शब्दात शिवसेनेने मत मांडले आहे. 

या लेखात म्हटले आहे, की 2014 मध्ये भाजपचा वारु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोखला होता, आता 2019 मध्ये तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखला आहे. विरोधकांचे 20-25 आमदारही येणार नाहीत, असं माध्यमात चित्र उभ करणाऱ्यांनी 100 पारचा टप्पा गाठला. सगळ्याचं श्रेय फक्त शरद पवारांना जाते. शिवसेनेच्या आज जरी 56 जागा असल्या, तरी रिमोट कंट्रोल मात्र उद्धव ठाकरे यांच्याच हाती आहे. काँग्रेस राष्ट्रवादीतले वतनदार विकत घेऊन, चौकशांचा धाक दाखवून आयारामांचा जो बाजार भरवला होता तो शेअर बाजारासारखा कोसळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Udyanraje Bhosale criticize Udyanraje Bhosale