Sanjay Raut Bail : 'टायगर इज बॅक' म्हणत सुषमा अंधारेंच्या डोळ्यात तरळले अश्रू! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut_Sushma Andhare

Sanjay Raut Bail : 'टायगर इज बॅक' म्हणत सुषमा अंधारेंच्या डोळ्यात तरळले अश्रू!

मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यावर शिवसेनेच्या पक्षनेत्या सुषमा अंधारे यांनी 'टायगर इज बॅक' असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे ही प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यामुळं शिवसैनिकांच्या भावनिकतेची चर्चा सुरु झाली आहे. (ShivSena News tears in Sushma Andharen eyes saying Tiger is back on Sanjay Raut Bail)

हेही वाचा: Sanjay Raut: संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार की मुक्काम वाढणार? जाणून घ्या कोर्टातील घडामोडी

अंधारे म्हणाल्या, टायगर इज बॅक....शेर वापस आया है इसलिए हम सब खुश है. हा मोठा आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी कारण तब्बल १०२ दिवसांनी आमच्या कुटुंबातील एक महत्वाचा सदस्य फार मोठं बालंट ज्यांच्यावर आलं त्या सगळ्यातून काहीही झालं तरी मी मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही हे ठामपणे सांगणारा आमचा नेता परत आलेला आहे.

हेही वाचा: Sanjay Raut: अखेर शंभर दिवसांनंतर संजय राऊतांना जामीन मंजूर

कारण जेव्हा लढाई चालू असते तेव्हा सेनापती आणि सरदार असणं गरजेचं आहे. संजय राऊतांनी आमच्यासाठी आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे की, बाळासाहेब ठाकरेंचा लढाऊ सरदार कसा असला पाहिजे. याच घटनेनं आम्हाला अजून एक गोष्ट शिकवली की जे लोक सुखात सोबत असतात ते खरे नसतात जे दु:खात सोबत असतात ते खरे असतात.

हेही वाचा: Dipali Sayyed: "मातोश्रीवरचे खोके.. " पक्ष प्रवेशाच्या घोषणेवेळी दीपाली सय्यदचे रश्मी ठाकरेंवर मोठे आरोप

ज्या चाळीस लोकांनी थोडा धीर धरला असता विश्वास ठेवला असता तर काय झालं असतं. पण ज्याला कर नाही त्याला डर कशाची. पण जे गेले ते फॉल्टी असल्यानं तिकडे गेले आणि वाट्टेल ते बरळत गेले. त्यांना वाटलं की शिवसेना संपली पण शिवसेना संपत नाही. चाळीस काय असे कितीही गेले तरी शिवसेना परतण्याची ताकद देते. त्यामुळं राऊत यांच्यासारखे सरदार आमच्यासोबत आहेत तोपर्यंत आम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. हा राज्यातील सर्व शिवसैनिकांसाठी संदेश आहे, असंही यावेळी अंधारे म्हणाल्या.