esakal | उद्धव ठाकरेंकडून भाजपचा खरपूस समाचार, दसरा मेळावा भाषणातील सर्व मुद्दे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरेंकडून भाजपचा खरपूस समाचार, दसरा मेळावा भाषणातील सर्व मुद्दे वाचा

आज मुंबईतून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली.

उद्धव ठाकरेंकडून भाजपचा खरपूस समाचार, दसरा मेळावा भाषणातील सर्व मुद्दे वाचा

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : आज मुंबईतून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा असल्याने शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा होता. कोरोनाचं सावट असल्याने यंदा पहिल्यांदाच दसरा मेळावा शिवतीर्थावरून न होता स्वातंत्र्यवीर सावरकर  सभागृहात केवळ ५० जणांच्या उपस्थिततीत पार पडला. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून न बोलता शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्राला आपल्या दसरा मेळाव्यातून संबोधित केलं. वर्षभर मनात साचलेलं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून बोलून दाखवलं... 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील सर्व मुद्दे :  

 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेत, काही वेळातच शिवसैनिकांना संबोधित करणार
 • आपल्या संपूर्ण परिवारासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेत
 • शिवाजी पार्कवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात जात उद्धव ठाकरे नतमस्तक
 • उद्धव ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल, सोबतच रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल 
 • उद्धव ठाकरे सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल, ढोलताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत
 • शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा पहिल्यांदाच सभागृहात, कोरोनामुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंचं संबोधन 
 • उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचं व्यासपीठावर आगमन 
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परंपरेनुसार केलं शस्त्रपूजन 
 • उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात, मराठीत मातीत काय तेज आहे मराठी मातीची ताकद काय आहे याची प्रचिती दिली नंदेश उमप यांनी करून दिली 
 • जर हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाहीत - उद्धव ठाकरे 
 • वर्षभरापासून मुख्यमंत्री झालो,गेल्या सहा महिन्यापासून फेसबुकवरून लाईव्ह बोलत होतो. आज मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेऊन बोलणार आहे. 
 • ज्या मातीने औरंगजेब गाडला त्या महाराष्ट्राच्या मातीचं तेज अजूनही तसंच आहे. 
 • हिंदुत्त्वावरून प्रश्न विचरतायत कारण मंदिरं उघडत नाही, हिंदुत्वाबाबत विचारणारे हे कोण ? - उद्धव ठाकरे 
 • एकमेकांना केवळ टोप्या नका घालू, हिंदुत्वाचा अर्थ सरसंघचालकांकडून समजून घ्या - उद्धव ठाकरे 
 • तुमच्यासाठी राज्यातील जनता मतं असतील पण माझ्यासाठी ही हाडामाणसाची माणसं आहेत - उद्धव ठाकरे 
 • जेवढं लक्ष पक्षावर देतायत, तेवढं लक्ष देशातील जनतेकडे द्या - उद्धव ठाकरे 
 • शिवसेना कायम GST ला विरोध करत होती, GST मुळे राज्याचे पैसे त्यांना मिळत नाहीत. 
 • GST करपद्धती सदोष आहे, आमच्या हक्काचा पैसा आम्हाला मिळत नसेल तर या करपद्धतीवर चर्चा करायला हवी
 • GST करप्रणालीमध्ये त्रुटी असतील तर मोदींनी त्या चुका सुधाराव्या    
 • माझं टार्गेट भाजप नाही, पण देशाची विल्हेवाट लागत चालली आहे, राजकारण एके राजकारण सुरु आहे
 • दानवेंचा बाप भाडोत्री असेल माझा नाही, लग्नाच्या आहेराची पाकिटं पळवून नेणारे तुमचे बाप - उद्धव ठाकरे 
 • मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर म्हणणारा रावण आलाय, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचे  - उद्धव ठाकरे 
 • महाराष्ट्र पुढे जातोय म्हणून महाराष्ट्राची बदनामी, मुंबई पाकव्याप्त काश्मीर, मुंबई पोलिसांचे काहीही लक्ष नाही असं दाखवलं जातंय 
 • महाराष्ट्र नशेडयांचं राज्य असल्याचं चित्र रंगवलं जातं - उद्धव ठाकरे 
 •  आमच्या अंगणात तुळशी वृंदावने आहेत, गांजाची नव्हे - उद्धव ठाकरे 
 • तोंडात शेण आणि गोमूत्र भरून ठाकरेंवर गुळण्या केल्यात,  शेण आणि गोमूत्राच्या चुळा आमच्यावर भरल्यात, आता ते शेण गिळा आणि गप्प बसा 
 • तुमच्याकडे लाठी काठी असेल, आमच्याकडे मनगट आहे. तलवारीने युद्ध जिंकलं जातं पण त्यासाठी मनगट लागतं
 • आम्ही महाराष्ट्र हिताचे निर्णय घेतलेत तर फटाके नका वाजवू पण खोटं तरी नका बोलू 
 • आम्ही एक नया पैसा खर्च न करता कारशेड उभारत आहोत, आम्ही ८०८ एकरांचा जंगल वाचवलं 
 • सध्याचा काळ कठोर आहे , मात्र केवळ राजकारण झालं तर देशात अराजकता निर्माण होईल 
 • विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्या, यापुढे महाराष्ट्रात कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही 
 • केवळ पाडापाडी करण्याचं भाजपाला रस आहे
 • सर्व समाजाच्या लोकांना हात जोडून सांगतो, जातीपातींचं राजकारण करणार्यांना बळी पडू नका 
 • मराठा, धनगर OBC आदिवासी सर्व समाजांना न्याय देणार, महाराष्ट्रात जातीवरून दुफळी माजू देऊ नका 

shivsena party chief uddhav thackerays dasara melawa 2020 speech all pointers