"दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधीकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधीकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक..."

सामानाच्या अग्रलेखातून आज भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलंय.

"दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधीकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक..."

मुंबई : सामानाच्या अग्रलेखातून आज भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलंय. देशात एकाच दिवसात १० हजार रुग्ण व्हावेत यावर केंद्रीय सरकार चिंता व्यक्त करायला तयार नाही. महाराष्ट्रात आलेल्या वादळामुळे लोकांचे हाल होतायत. त्यांच्यापर्यंत केंद्रीय मदतीचा हात पोहचत नाही मात्र विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी मात्र निधी व पथके पोहोचताना दिसतायत. संकटाची संधी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मत मोदींनी 'इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स' च्या कार्यक्रमात मांडलं. मात्र भक्तांनी 'मोदी उवाच'चा अनर्थ केला मोदींनी या संधीसाधूंची एकदा शाळा घ्यावीअसं संजय राऊतांनी आजच्या अग्रलेखात म्हटलंय. 

मोठी बातमी -  मृतदेह झाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅग्जची 5 पट जास्त किंमतीत खरेदी?

कोरोनाच्या संवेदनशील काळात भाजपकडून मोठया प्रमाणात राजकारण करण्यात येत असल्याचं या अग्रलेखात म्हटलंय. जोतिरादित्य शिंदे यांना केंद्रात मंत्रिपदाचं गाजर दाखवण्यात आलं. मात्र कोरोना संकटामुळे गाजराची शेती सुकली आहे. आता या गाजराचा साठा राजस्थानात  पाठवला आहे असंही या अग्रलेखात म्हटलंय.

“कोरोनाशी युद्ध सुरु झाले असतानाच भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाचे बावीस आमदार फोडले आणि संकटातील संधीचे सोने करुन दाखवले. या बदल्यात शिंदे समर्थकांना काही फुटकळ मंत्रिपदे मिळाली. स्वतः शिंदे यांना केंद्रात मंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात आले, पण कोरोना संकटामुळे ही गाजराची शेती सुकली आहे. आता या गाजरांचा साठा राजस्थानात पाठवला आहे आणि तिथे संधीचे सोने करण्याचे पिक निघेल काय, यासाठी पेरणी आणि खतांची फवारणीही सुरु झाली आहे” असंही आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मोठी बातमी - मुंबईतील लोकलसेवा सुरु झाल्यास गर्दी टाळण्यासाठी 'हा' पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता...

वरच्यासाच्या मदतीने या मथळ्याच्या अंतर्गत लिहिलंय की, संधीचं सोनं केलं. महाराष्ट्रातही राज्य स्थापन करण्याचा प्रयोग सहा महिन्यांपूर्वी झाला. पण तो प्रयोग कोसळला. देशात सध्या कोरोनाचं संकट मानवी जीवनाचा घास गिळत असताना दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधीकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक असल्याचं आजच्या अग्रलेखात म्हटलंय. 

shivsena rajyasabha MP targets central government for doing politics in lockdown period

Web Title: Shivsena Rajyasabha Mp Targets Central Government Doing Politics Lockdown Period

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top