Andheri ByElection: ऋतुजा लटकेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा मोठा दिलासा

ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहेत.
Rutuja latke
Rutuja latke

Andheri ByElection : ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. उद्या ११ वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला आहे. त्यामुळं ऋतुजा लटके यांचा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (ShivSena Rutuja Latke way clear to contest Andheri byelection Mumbai high court decision)

हायकोर्टानं निर्णय देताना काय म्हटलं?

ऋतुजा लटके आणि मुंबई महापालिका अशा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टानं दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आपला निकाल दिला. हायकोर्टानं थेट मुंबई महापालिकेला आदेश दिला की, उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या. या परिस्थितीत आम्हाला हस्तेक्षेप करावा लागत आहे, अशी टिप्पणीही यावेळी हाकोर्टानं निर्णय देताना केली.

पेचप्रसंग काय होता?

अंधेरी पूर्वचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानं या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटानं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. पण त्या मुंबई महापालिकेत क्लर्क म्हणून काम करत असल्यानं या पदाचा राजीनामा दिल्याशिवाय त्यांना ही पोटनिवडणूक लढवता येणार नव्हती. त्यामुळं लटके यांनी महापालिकेकडे रितसर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण मुंबई महापालिकेनं त्यांचा राजीनामा स्विकारण्यास नियमांचे कारण देत वेळकाढूपणा केला. त्यामुळं लटके यांना थेट मुंबई हायकोर्टात धाव घ्यावी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com