

Uddhav Thackeray
esakal
मुंबई - दोन गुजरात्यांच्या हाती आपली मुंबई द्यायची नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी उमेदवारांना मार्गदर्शन करताना भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला.