esakal | समुद्रावरही भगवा फडकणार- आदित्य ठाकरे 
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्रावरही भगवा फडकणार- आदित्य ठाकरे 

महापालिका, रुग्णालये, त्याचबरोबर हवाई वाहतूक क्षेत्रात कामगार संघटना उभारून शिवसेनेने भगवा झेंडा फडकविला आहे. राष्ट्रीय नाविक कामगार परिषद आपल्यासोबत आज येत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. यापुढे समुद्रावरही शिवसेनेचा झेंडा पाहायला मिळेल, असा दावा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. 

समुद्रावरही भगवा फडकणार- आदित्य ठाकरे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापालिका, रुग्णालये, त्याचबरोबर हवाई वाहतूक क्षेत्रात कामगार संघटना उभारून शिवसेनेने भगवा झेंडा फडकविला आहे. राष्ट्रीय नाविक कामगार परिषद आपल्यासोबत आज येत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. यापुढे समुद्रावरही शिवसेनेचा झेंडा पाहायला मिळेल, असा दावा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. 

शिवसेनेची भूमिका केवळ अन्यायाच्या विरोधात लढण्याची आहे. नाविक कामगारांच्या मागण्यांसाठी शिवसेना पुढाकार घेईल, असे आदित्य म्हणाले. 

फॉरवर्ड सिमेन्स युनियन ऑफ इंडिया या नाविकांच्या संघटनेने आज 11 राज्यांतील प्रमुख पदाधिकारी आणि कामगार यांच्या बैठकीत ठराव मंजूर करत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या संघटनेचे 52 हजार 500 सदस्य असून, 11 राज्यांत कार्यालये आहेत. 

गेले कित्येक वर्षे नाविकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडवण्यासाठी शिवसेनेसोबत जात असल्याचे संघटनेचे सरचिटणीस नरेश बिरवाडकर यांनी सांगितले. 

loading image
go to top