ठाण्यातील दुकाने रात्री साडेनऊपर्यंत सुरू; महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला आदेश

राजेश मोरे
Monday, 12 October 2020

म्हस्के यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ठाण्यातील दुकाने रात्री 9.30 पर्यंत सुरू ठेवण्यात यावीत असे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले आहेत. 

ठाणे : लॉकडाऊनमुळे व्यवसायावर मर्यादा आल्याने नुकसान होत असल्याने ठाण्यातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेऊन दुकाने रात्री 9.30 पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली होती. त्याबाबत म्हस्के यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ठाण्यातील दुकाने रात्री 9.30 पर्यंत सुरू ठेवण्यात यावीत असे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले आहेत. 

Powercut: रायगडमध्ये बत्ती गुल; निम्म्या जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित

ठाण्यातील व्यापारी संघटनांच्या एका शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे व महापौरांना निवेदन देऊन ठाण्यातील सर्व दुकाने रात्री 9.30 पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली होती. ठाणे व्यापार उद्योग महासंघाचे अध्यक्ष देवीलाल जैन, उपाध्यक्ष हिरेन शहा, उपाध्यक्ष आशीष गणू, महासचिव भावेश मारू, वरिष्ठ उपाध्यक्ष आशीष शिरसाट आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. त्यानंतर म्हस्के यांनी शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून दुकानांची वेळ रात्री 9.30 पर्यंत वाढवण्याबाबत आवश्‍यक ती कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 

दुकानदारांना सूचना 
- सर्वांनी मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा. वेळोवेळी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करावा. दुकानात ग्राहकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांची थर्मल तपासणी करावी. 
- ग्राहकांनी मास्क लावले नसतील तर संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल. त्याबाबत महापालिकेने सर्वांना सूचना द्यावी, असे आदेश महापौरांनी दिले आहेत. 
- जे दुकानदार नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shops in Thane open till midnight Mayor Naresh Mhaske's order to the administration